Homeपुणे / पिंपरी-चिंचवडऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रम; गुणवंत खेळाडूंचा सन्मान

ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रम; गुणवंत खेळाडूंचा सन्मान

पुणे (दि.२३) : “राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या अडचणी सोडवून आवश्यक सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभं आहे,” असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केलं.

ऑलिम्पिक दिनानिमित्त सर परशुराम महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा व युवक कल्याण संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, विभागीय उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सर परशुराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, महासचिव नामदेव शिरगावकर, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ऑलिम्पिक भवन, थेट नियुक्त्या आणि सुविधा केंद्रे

भरणे म्हणाले, “१९५२ मध्ये स्व. खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यानंतर पॅरालिम्पिकमधूनही राज्यातील खेळाडूंनी मान मिळवला आहे. त्यांच्या प्रोत्साहनासाठी शासनाने ५ टक्के नोकरी आरक्षण, थेट नियुक्त्या व आर्थिक सहाय्याची धोरणं राबवली आहेत. २०२४-२५ या वर्षात १४९ खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यात आली. बालेवाडीत उभारण्यात येणाऱ्या ऑलिम्पिक भवनातून खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा मिळणार आहेत.”

ते पुढे म्हणाले, “२०२८ व २०३२ ऑलिम्पिक स्पर्धांकडे लक्ष ठेवून प्रत्येक गावातून ऑलिम्पिकवीर घडवण्याचा संकल्प करूया. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदके मिळवावीत, हीच अपेक्षा आहे.”

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी क्रीडा व्हिजन

आयुक्त शीतल तेली-उगले म्हणाल्या, “महाराष्ट्र हे गुणवंत खेळाडूंनी परिपूर्ण असलेलं राज्य आहे. मात्र, ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अपेक्षित यश हाती आलेले नाही. म्हणूनच ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटसाठी नागरिकांनीही सुचना द्याव्यात. क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून गुणवान खेळाडूंना शोधून प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, शिष्यवृत्ती, पुरस्कार दिले जात आहेत. जिल्हा, तालुका आणि विभागीय स्तरावर क्रीडा संकुलांचे काम सुरू असून यासाठी भरपूर निधी उपलब्ध केला आहे.”

गावागावांतून खेळाडू घडविण्यावर भर

ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर म्हणाले, “राज्यातील ऑलिम्पिक चळवळ ही देशातील सर्वात मोठी आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानावर आणण्याचे काम सुरू आहे. शिबिरे आणि सुविधांमुळे त्यांची पूर्वतयारी भक्कम होते.”

गौरव आणि प्रात्यक्षिकांनी भरलेला दिवस

कार्यक्रमात ऑलिम्पियन बॉक्सिंगपटू मनोज पिंगळे, हॉकीपटू रेखा भिडे, अर्जून पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार, कबड्डीपटू शांताराम जाधव, रोईंगपटू स्मिता यादव-शिरोळे, तिरंदाज गाथा खडके, बॅडमिंटनपटू प्रंदीप गंधे, कुस्तीपटू गायत्री शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना, मल्लखांब, योगा, जिम्नॅस्टिक, किक बॉक्सिंग आणि मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी झाली. त्यापूर्वी लाल महाल ते सर परशुराम महाविद्यालय दरम्यान ऑलिम्पिक दौडचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

सर्वोच्च न्यायालय सीबीएसई डिजिटल मार्किंग सिस्टम

0
नवी दिल्ली14 तासांपूर्वीलिंक कॉपी करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत विद्यार्थ्यांच्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले,...

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!