मुळशी (अंबडवेट, दि.२३) : पुणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व पुण्याचे पालकमंत्री मा. नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार शंकर मांडेकर यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. रवींद्र (बाबा) कंधारे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत अंबडवेट ता.मुळशी अंतर्गत दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यामध्ये धाकटी सुतारवाडी रस्ता व अमराळेवाडी रस्ता अशा एकूण वीस लाखांच्या विकासकामांचा समावेश आहे. या कामांचा शुभारंभ आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत शांताराम दादा इंगवले, बाबा कंधारे, राजाभाऊ ढमाले, तात्या देवकर, नीताताई नांगरे, सचिन अमराळे, विलास अमराळे, सुनील आमले, रोहिणी अमराळे, शीतल अमराळे, किरण अमराळे, शशिकांत नांगरे, राजू मारणे, अशोक नांगरे, यशवंत अमराळे, हितेश अमराळे, योगेश अमराळे, सदाशिव अमराळे, ज्ञानेश्वर अमराळे, नारायण आमराळे, भगवान अमराळे, पाटील गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले.
रस्त्यांच्या कामांमुळे येथील नागरीकांना चांगला लाभ होणार असून, ग्रामविकासाला गती मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



































