Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकहिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली 'हिंदु...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा !

पुणे – घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत असलेल्या समितीच्या वतीने या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभरात विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात ‘हिंदवी स्वराज्या’ची प्रतिज्ञा घेतली होती, त्याच प्रेरणादायी धर्तीवर पुणे येथे चतुःश्रृंगी मंदिर येथे आणि श्री तुकाई माता मंदिर, पारगाव (सा.मा.) येथे श्री तुकाई मातेच्या चरणी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि समाजबांधवांनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची ऐतिहासिक प्रतिज्ञा घेतली.

या वेळी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करून भारत देशाला पुन्हा ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र’ अर्थात् रामराज्य बनवण्यासाठी आयुष्य समर्पित करण्याचा दृढ निर्धार करण्यात आला. या प्रतिज्ञेद्वारे सनातन हिंदु धर्मावर अढळ श्रद्धा ठेवणे, हिंदु संस्कृतीचे संवर्धन करणे, तसेच देवळे, गोमाता आणि स्त्रियांचे प्राणपणाने रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली. यासह आक्रमकांनी नष्ट केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांप्रमाणे ‘शक्तीची उपासना’ करून हिंदु राष्ट्रासाठी तन-मन-धनाचा त्याग करण्यासाठी सर्वांनी कटिबद्धता दर्शवली. “आता एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।।” या निनादाने या वेळी हिंदु राष्ट्राचा जागर करण्यात आला.

समितीच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरू झालेल्या या राष्ट्रकार्यात आणि आगामी धर्मकार्यात सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!