Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकमुलांना भुलवू नका; खरा ‘सांता क्लॉज’ दाखवा, १ लाख मिळवा ! -...

मुलांना भुलवू नका; खरा ‘सांता क्लॉज’ दाखवा, १ लाख मिळवा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे आवाहन

कोल्हापूर – ‘ख्रिसमस’ जवळ आली की,भारतातील बहुतांश शहरांत चौकाचौकांत ‘सांता क्लॉज’च्या टोप्या विकणारे मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात. हिंदु असूनही स्वतःला पुरोगामी, सर्वधर्मसमभावी म्हणवणारी मंडळी स्वतः आणि आपल्या मुलांना या टोप्या घेऊन तथाकथित ‘सांता क्लॉज’ मुले झोपल्यावर येतो आणि त्यांच्यासाठी ‘गिफ्ट’ ठेवून जातो, ही भ्रामक कथा सांगून मुलांचे सांस्कृतिक धर्मांतरण करण्याला आरंभ करतात. पण खरंच ‘सांता क्लॉज’ होऊन गेला का? ‘सांता क्लॉज’ म्हणून येऊन मुलांना खरंच कोणी गिफ्ट देतं का? या ‘सांता’विषयी ख्रिस्ती धर्मीयांचीच काय धारणा आहे? याचा हिंदु समाज काही विचार न करता या भूलथापांना बळी पडून हिंदु मुलांना अंधश्रद्धेच्या आहारी नेत आहेत. इतर वेळी हिंदु देवतांना ‘थोतांड’ म्हणणारे आणि हिंदु प्रथा-परंपरांना विरोध करणारे आहे, या वेळी गप्प का आहेत? आम्ही समस्त हिंदु समाजाकडून आवाहन करत आहोत, ‘खरा ‘सांता क्लॉज’ येतो, हे सिद्ध करा आणि 1 लाख रुपये मिळवा !’ जर हे असे खोटे आहे, तर मुलांना भुलवू नका, असे आवाहन ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे तालुका संयोजक श्री. नितीन काकडे यांनी केले. 
      ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. पराग फडणीस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
ख्रिस्ती धर्मगुरु काय म्हणत आहेत ?  ‘सांता क्लॉज’विषयी ख्रिस्ती धर्मगुरुंनीच काय म्हटले आहे, ते अतिशय धक्कादायक आहे. यातील काहीच जणांची वक्तव्ये कळली, तरी यातील खोटेपणा लक्षात येईल. इटलीतील बिशप अँटोनियो स्टॅग्लियानो ‘सांता क्लॉज’च्या अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत म्हणतात, ‘सांता क्लॉज हा एक काल्पनिक चेहरा असून कोका-कोला कंपनीने त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी त्याचा वापर केला आहे !’ अमेरिकेतील प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक आणि पाद्री मार्क ड्रीस्कॉल ‘सांता क्लॉज’ला ‘ख्रिसमसचा राक्षस’ म्हटले आहे, जो पालकांना आपल्या मुलांशी खोटे बोलण्यास भाग पाडतो. ‘मुलांना खोटे सांगणे की सांता अस्तित्वात आहे, हे त्यांच्या विश्‍वासाला तडा देण्यासारखे आहे,’ असे त्यांचे मत आहे.
     ख्रिस्त्यांच्या ४ प्रमुख चर्चसंस्थांपैकी ‘ऑर्थोडॉक्स चर्च’मध्ये सांता क्लॉज ही संकल्पना जवळजवळ पूर्णपणे नाकारली जाते. रशिया, ग्रीस अश देशांतील ऑर्थोडॉक्स चर्च सांताऐवजी ’सेंट बेसिल’ किंवा ‘फादर फ्रॉस्ट’ यांना मानतात. त्यांच्या मते, सांता हा बाजारपेठेने तयार केलेला एक भ्रम आहे, ज्याचा  ऑर्थोडॉक्स आध्यात्मिक परंपरेशी संबंध नाही. ‘अँग्लिकन चर्च’च्या मते ‘सांता ही मनोरंजक कथा असून ख्रिसमसचा केंद्रबिंदू नाही’, तर ‘प्रोटेस्टंट संस्था’ सांता क्लॉजला ‘मूर्तीपूजा’ किंवा ‘अंधश्रद्धा’ मानतात.
ख्रिस्ती धर्मगुरु आणि संस्थाच ज्या सांता क्लॉजला ‘थोतांड’ म्हणत असतांना हिंदूंनी त्याचा उदो उदो का करायचा? वेळीच सावध व्हा, आपल्या मुलांवर हिंदु धर्मानुसार संस्कार करा. लहानपणीच त्यांच्यावर ख्रिस्ती अंधश्रद्धा लादू नका. एरवी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांना लक्ष्य करणारी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या बाबतीत मूग गिळून बसली आहे का? ‘अंनिस’ला ‘सांता’मध्ये कोणता पुरोगामीपणा किंवा विज्ञानवादी दृष्टीकोन दिसतो, हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही हिंदु राष्ट्र समन्वय समितीने केले आहे.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना उच्च पद मिळण्याचे योग, तर कन्या राशीच्या लोकांना प्रमोशन...

0
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना उच्च पद किंवा मोठी प्रशासकीय जबाबदारी मिळण्याचे प्रबळ संकेत आहेत. सरकारी कंत्राटे आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित...

एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! – श्री. शॉन क्लार्क

0
‘कॉप-३१’ जागतिक हवामान परिषदेत भारतीय शिष्टमंडळातर्फे भारताचा आध्यात्मिक संशोधन दृष्टिकोन सादर ‘पर्यावरण जाणीव चळवळ’ : एका शाश्वत जगाची सुरुवात आंतरिक परिवर्तनातून! - श्री. शॉन...

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!