Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकमंगल पांडेंची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच दिल्लीत...

मंगल पांडेंची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच दिल्लीत…

दिल्ली शंखनाद महोत्सवात ‘शौर्य’ व ‘श्रद्धा’ यांचा अद्भुत संगम!

* दुर्मिळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश आणि रामसेतूची दिव्य रामशिळा यांचे दर्शन!

     नवी दिल्ली – भारताच्या इतिहासातील ‘भक्ती’ आणि ‘शक्ति’ यांचा संगम घडवणारा एक अद्वितीय सोहळा देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये साकारत आहे. ‘सेव्ह कल्चर, सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘सनातन संस्था’ आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ दिनांक १३ ते १५ डिसेंबर, भारत मंडपम्, नवी दिल्ली येथे होत आहे. या भव्य महोत्सवात १८५७ च्या पहिल्या बंडातील आद्यक्रांतीकारी मंगल पांडे यांनी वापरलेली बंदूक आणि मध्य प्रदेशच्या राजघराण्यातील मल्हारराव होळकर, तसेच क्रांतीसिंह नाना पाटील यांनी वापरलेल्या बंदूका प्रथमच दिल्लीकरांसमोर येणार आहेत. पानीपतच्या युद्धातील तोफा यांसह १५०० दुर्मिळ शस्त्रे पाहायला मिळणार आहेत. या महोत्सवात पराक्रमाचा तेजस्वी इतिहास आणि चैतन्यदायी अध्यात्माचा अद्भुत संयोग अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली.

‘स्वराज्याचा शौर्यनाद’ : शिवकालीन शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन :

         

     या महोत्सवातील ‘स्वराज्याचा शौर्यनाद’ प्रदर्शनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १५०० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रांचा भव्य संग्रह प्रथमच दिल्लीकरांसमोर उलगडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्पर्श करून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना दिलेली तलवार, ढाळ, दांडपट्टा, कट्यार, बंदूक, २ तोफा; बालक आणि स्त्रिया यांच्या रक्षणासाठीची शस्त्रे यांचाही समावेश आहे. तसेच महाराणा प्रताप आणि विजयनगर साम्राज्यकालीन शस्त्रेही येथे पहाता येतील. हे केवळ शस्त्रांचे प्रदर्शन नसून लहान मुलांना यातून प्रेरणा मिळावी, म्हणून काही शस्त्रे हाताळण्यासाठी दिली जाणार आहेत, हे या प्रदर्शाचे वैशिष्ट्य आहे. तसेच तोफ कशी उडवली जाते, याचे प्रात्याक्षिक दाखवले जाणार आहे. हे शस्त्रप्रदर्शन ‘हॉल क्रमांक १२’ मध्ये सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील.

१ सहस्र वर्षांनंतर सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन !

 

         या महोत्सवात १ सहस्र वर्षांहून अधिक काळ जपलेल्या मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या अवशेषांचे दर्शन प्रथमच सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. गझनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेल्या हे पवित्र अवशेष पुजारी कुटुंबाने तमिळनाडूत सुरक्षित ठेवले असून, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाने सनातन संस्थेमार्फत प्रदर्शित होणार आहेत. तसेच प्रभू श्रीरामांनी बांधलेल्या रामसेतूच्या अवशेषांपैकी रामशिळा (पाण्यावर तरंगणारे दगड) हे देखील येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

       ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा‘च्या माध्यमातून राष्ट्ररक्षण, संस्कृती, शौर्य व हिंदवी स्वराज्याचे तेज चेतविण्याचा प्रयत्न आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी लहान मुलांसह युवापिढीला पालकांना अवश्य घेऊन यावे, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे. हा महोत्सव SanatanRashtraShankhnad.in या संकेतस्थळावर लाइव्ह पहाता येईल.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!