Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकहिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही...

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही ! – हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे पाकिस्तानसाेबत ‘पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही’, अशी भूमिका भारत सरकारने घेतली होती. तीच भूमिका आता बांगलादेश सोबतही घ्यायला हवी. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारांना विसरून बांगलादेशी खेळाडूंना भारतभूमीवर ‘रेड कार्पेट’ अंथरणे, आम्ही कदापि सहन करणार नाही. हीच भूमिका आयपीएल मधील सर्व संघमालकांनी घ्यायला हवी होती; मात्र ‘बीसीसीआय’च्या निर्णयानंतर बांगलादेशी खेळाडू मुस्तफीजुर रहमानला ‍वगळण्यात आले. ‘हिंसा आणि खेळ हे देखील एका वेळी करता येणार नाही’, असा संदेश भारत सरकारने बांगलादेशला द्यायला हवा. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या एकाही खेळाडूला भारतभूमीवर खेळू देणे, हा हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे होईल, त्यामुळे या देशांच्या खेळाडूंना भारतात खेळवण्यावर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

भारतभूमीवर बांगलादेशी आणि पाकिस्तानी खेळाडूला खेळण्यास अनुमती देऊ नये, अशा मागणीचे निवेदन समितीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षांना पाठवले आहे. समितीने काही दिवसापूर्वीच बांगलादेशी खेळाडू मुस्तफीजुर रहमान याला कोलकाता नाइट रायडर्स संघातून वगळण्याची मागणी केली होती. यावर आज बीसीसीआयने भूमिका घेतली. बीसीसीआयच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो; मात्र हीच भूमिका सर्वप्रथम ‘कोलकाता नाइट रायडर्स’च्या संघमालकाने घ्यायला हवी होती; मात्र शाहरूख खाने अशी भूमिका स्वतःहून घेतली नाही. त्याला बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांपेक्षा स्वतःचा संघ, व्यवसाय आणि त्यातून होणारी कमाई महत्त्वाचे वाटते, हे निंदनीय आहे. बांगलादेशी खेळाडूंना प्रोत्साहन देणे म्हणजे त्या बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसेला अप्रत्यक्ष पाठबळ देणेच होय. त्यामुळे आम्ही शाहरूख खानचा जाहीर निषेध करतो, तसेच त्याने देशाची माफी मागावी, अशी मागणी करतो.

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, याशिवाय अनधिकृत बांगलादेशी घुसखोरांमुळे भारतातील कायदा सुव्यवस्था बिघडणे, मानवीतस्करी, अमली पदार्थांचे रॅकेट, वेश्याव्यवसाय आदी गुन्हेगारी क्षेत्रांतही सुळसुळाट झाला आहे. तरी बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात हाकलून लावावे, असेही समितीने म्हटले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!