Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांक'सुराज्य अभियाना'च्या पाठपुराव्याला यश : एसटीची राज्यभर 'डीप क्लीनिंग' मोहीम !

‘सुराज्य अभियाना’च्या पाठपुराव्याला यश : एसटीची राज्यभर ‘डीप क्लीनिंग’ मोहीम !

पण एसटीची मृतावस्थेत’ असलेली हेल्पलाईन कधी बोलणार – सुराज्य अभियानाचा सवाल

मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने एसटी डेपोच्या स्वच्छतेसाठी राज्यभरात केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या अभियानाची दखल घेत राज्य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियान सुरू केले; मात्र बसस्थानकाची स्वच्छता नियमितपणे राहण्यासाठी आता डेपो व्यवस्थापकांना दर १५ दिवसांनी स्थानकांचे सखोल स्वच्छता (डीप क्लीनिंग) करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; मात्र बसस्थानकांचा परिसर चकाचक होत असला, तरी प्रवाशांसाठीची ‘संपर्क यंत्रणा’ आजही ‘मृतावस्थेत’ आहे. त्यामुळे १५ दिवसांनी होणाऱ्या ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेत केवळ फरशी न पुसता, राज्यभरातील बंद पडलेली संपर्क यंत्रणा (हेल्पलाईन) चालू करून तिलाही उर्जितावस्था द्यावी, अशी आग्रही मागणी ‘सुराज्य अभियाना’ने केली आहे.

          एसटी प्रशासनाने नुकतेच स्वच्छतेबाबत सकारात्मक पाऊल उचलले आहे; परंतु ‘सुराज्य अभियाना’ने एका गंभीर विसंगतीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अनेक बसस्थानकांवर चौकशी खिडकीवरील फोन उचलले जात नाहीत किंवा ते बंद असतात. प्रवाशांना गाड्यांच्या वेळा, बदल किंवा तक्रारींसाठी संपर्क साधायचा झाल्यास त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. राज्यभरातून येत असलेल्या तक्रारींची नोंद घेत सुराज्य अभियानाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांतील २१ आगार व्यवस्थापकांना निवेदने देऊन ही परवड प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सुराज्य अभियानाने या संदर्भात पाठवलेल्या ईमेलची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय (CMO) आणि एसटी प्रशासनाने राज्यातील ३१ विभागांना तातडीने त्रुटी सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.

          याविषयी भूमिका मांडतांना सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. अभिषेक मुरकुटे यांनी म्हटले की, ‘‘प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेऊन ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियान सुरू केले, ही स्वागतार्ह बाब आहे; मात्र सक्रीय हेल्पलाईनशिवाय ही मोहीम अपूर्ण आहे. प्रवाशांना जर एसटीशी संपर्कच साधता येत नसेल, तर त्या सौंदर्यीकरणाचा उपयोग काय? त्यामुळे १५ दिवसांनी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत ‘संपर्क यंत्रणेची चाचपणी’ हा नियमच करावा. या ‘सेवा लेखापरीक्षणात’ (Service Audit) हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत ‘नकारात्मक नोंद’ करण्यात यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.’’

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!