Homeपुणे / पिंपरी-चिंचवडशाळेतील पहिल्या पावलांचे ठसे कागदावर उमटवले; वारजेतील रामचंद्र पाटील चौधरी शाळेत फुग्यांच्या...

शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे कागदावर उमटवले; वारजेतील रामचंद्र पाटील चौधरी शाळेत फुग्यांच्या कमानीतून, औक्षण व कुंकवाच्या साक्षीने मुलांचे जंगी स्वागत

शाळेतील पहिल्या पावलांचे ठसे कागदावर उमटवले; वारजेतील रामचंद्र पाटील चौधरी शाळेत फुग्यांच्या कमानीतून, औक्षण व कुंकवाच्या साक्षीने मुलांचे जंगी स्वागत

पुणे (वारजे) : पहिल्याच दिवसाच्या शाळेच्या दारी लहानग्यांचे स्वागत फुलांच्या रंगीबेरंगी सरीत, फुग्यांच्या कमानीतून झाले… कोवळ्या चिमुकल्यांच्या छोट्याशा पावलांनी नवीन शिक्षणाच्या जगात प्रवेश घेतला तो औक्षणाच्या संस्कारासह आणि कुंकवाच्या स्पर्शाने. त्यांच्या या पहिल्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून पालकांच्या हाती जपून दिले गेले. हा केवळ एक समारंभ नव्हता, तर त्यांच्या शालेय प्रवासाचा पहिला जपलेला क्षणच होता.

वारजेतील पुणे महापालिकेच्या ह.भ.प. रामचंद्र पाटील चौधरी प्राथमिक शाळा (१०१ व २०५) येथे ‘पहिलं पाऊल’ या अभिनव उपक्रमांतर्गत नवागत विद्यार्थ्यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरील कुतूहल, उत्साह आणि आनंद पालकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या स्वरूपात ओघळत होते.

विद्यार्थ्यांना औक्षण करण्यात आले, फुलांची शुभेच्छा, चॉकलेट व नवीन पाठ्यपुस्तक संच देण्यात आले. शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुग्यांच्या कमानी, सेल्फी पॉईंट्स आणि सुशोभित दाराने या छोट्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी खुलून दिसत होता.

या समारंभास महापालिकेचे स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता श्री. नंदकिशोर जगताप, वारजे- कर्वेनगर पाणीपुरवठा अभियंता सौ. अपर्णा देसाई, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे व सौ. वृषाली चौधरी, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब दुपारगुडे उपस्थित होते. त्यांच्या शुभेच्छांसह या कार्यक्रमास चारचाँद लागले.

येथील शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा आगरवाल (१०१) आणि प्रतिभा बागुल (२०५) यांच्या मार्गदर्शनाखाली समारंभ अतिशय शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. ‘पहिलं पाऊल’ या उपक्रमाने लहानग्यांच्या शालेय जीवनाचा पहिला दिवसच त्यांच्या आणि पालकांच्या स्मरणात कायमचा जपून ठेवणारा क्षण घडवून आणला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!