Homeसांस्कृतिकवारीनिमित्त हिंदू जनजागृती समितीचे विविध उपक्रम

वारीनिमित्त हिंदू जनजागृती समितीचे विविध उपक्रम

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सामाजिक जाणीव जोपासत वारकऱ्यांना आरोग्य व सेवा पुरविण्याच्या उद्देशाने आरोग्य तपासणी, मंदिर स्वच्छता, अन्नदान, शालेय साहित्य वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

२१ जून रोजी मंगळवार पेठ गावठाण, पुणे येथे हिंदू जनजागृती समिती न्यासाच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ३०० हून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी पायाला जखमा झालेल्या वारकऱ्यांना ड्रेसिंग करून औषधोपचार करण्यात आले. हे शिबिर डॉ. प्रज्ञा सीडाम आणि डॉ. प्राजक्ता बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

तसेच २२ जून रोजी हिंदू जनजागृती समिती व महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी ख्रिस्ती मिशनरी मंडळींकडून वारीमध्ये बायबल वाटप व प्रचार केल्याचा प्रकार उघड झाला. यावर कठोर कारवाई करण्याची मागणी समितीने केली असून यासंदर्भात पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे यांना निवेदन देण्यात आले. आमदार शिवतारे यांनी त्वरित पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना दूरध्वनीवरून सूचना देत एफआयआर दाखल करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

यावेळी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानकरीही उपस्थित होते. वारकऱ्यांची सेवा, परंपरेचे रक्षण आणि समाजजागृती असा त्रिवेणी संगम साधत हिंदू जनजागृती समितीने वारीनिमित्त समाजपयोगी उपक्रम राबवून कौतुकास्पद कार्य केले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!