Homeपुणे / पिंपरी-चिंचवडवारकऱ्यांच्या सेवेसाठी लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

वारकऱ्यांच्या सेवेसाठी लहू बालवडकर सोशल वेल्फेअरच्या रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

पुणे (बालेवाडी) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लहू बालवडकर सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी तिसऱ्यांदा मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते या विशेष अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे उद्घाटन झाले.

ही सेवा संस्थापक लहू बालवडकर यांच्या आजी कै. श्रीमती भिकाबाई शंकर बालवडकर यांच्या वारीतील भक्तिभावाची प्रेरणा घेत राबवली जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून त्या पायी वारी करत होत्या. त्यांच्याच संकल्पनेतून, गेली तीन वर्षे संस्थेकडून वारी मार्गावर रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. यंदाही ही सेवा अधिक जोमाने देण्यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. बालवडकर सोशल वेल्फेअर संस्थेने सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो फारच उपयुक्त ठरणार आहे.”

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “आषाढी वारी ही आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे. या वारीत लाखो भाविक सहभागी होतात. त्यांना वेळेवर आरोग्यसेवा देणं महत्त्वाचं आहे आणि लहू बालवडकर यांचे हे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे.”

या उपक्रमांतर्गत संपूर्ण वारी मार्गावर मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचारांची सोय करण्यात आली आहे. वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लहू गजानन बालवडकर (अध्यक्ष, कोथरूड विधानसभा – उत्तर मंडळ) यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, सुभाष भोळ, मनोज दळवी, श्रेयश जाधवर, अभय बागल, वैदहीताई बापट, स्मृतीताई जैन, उज्वलाताई साबळे, मीनाताई पारगावकर आदींसह लहू बालवडकर मित्रपरिवार उपस्थित होता.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!