Homeपुणे / पिंपरी-चिंचवडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे (दि.१८) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीमती सुनेत्राताई पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शन व पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थिती वारकरी माऊलींना वंदन केले. मंदिर संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थानच्या विश्वस्तांशी चर्चा केली.

महापुजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!