Homeमहाराष्ट्रविक्रम नारायण पांचाळ खून प्रकरण:कोर्टामध्ये आरोपीने शर्ट काढून दाखवल्या मारहाणीच्या खुणा

विक्रम नारायण पांचाळ खून प्रकरण:कोर्टामध्ये आरोपीने शर्ट काढून दाखवल्या मारहाणीच्या खुणा

पुरणमल लाहोटी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्थेतील २० वर्षीय विद्यार्थी विक्रम नारायण पांचाळ याचा खून केल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पाचवा आरोपी प्रविण विनायक कराड याला शनिवारी (दि. २१) अटक केली. दरम्यान, दुपारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याने न्यायाधीशांकडे पोलिसांची तक्रार करत, पोलिसांनी आपल्याला बेदम मारहान केल्याचे सांगत न्यायालयातच शर्ट काढून दाखवला. परंतु पोलिसांनी तुला कशाने मारले असे विचारल्यावर त्याला सांगता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्या चौघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. पुरणमल लाहोटी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्था लातूर येथील तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुणावर चाकू हल्ला करुन खून केल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला श्रीधर पाटील, प्रणव उदगीरे, सुजल दिंडे, केदार क्षीरसागर या चौघांना अटक केली होती. त्यांना दिलेली चार दिवसांची पोलीस कोठडी शनिवारी संपल्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर पोलिस कोठडी दरम्यान मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारे आणखी तीन आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातील प्रविण विनायक कराड याला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली तर अन्य दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. न्यायालयीन कामकाजादरम्यान पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रविण कराड याच्या अटकेची माहिती त्याच्या वडिलांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ते अधिकृत पत्र स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान, न्यायालयाने सर्व बाबी तपासून आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!