Homeमनोरंजनअमेरिकेत सरकारी उपकरणांवर व्हॉटसअ‍ॅपवर बंदी: डेटा सुरक्षिततेचा अभाव, सायबर हल्ल्याची भीती यामुळे...

अमेरिकेत सरकारी उपकरणांवर व्हॉटसअ‍ॅपवर बंदी: डेटा सुरक्षिततेचा अभाव, सायबर हल्ल्याची भीती यामुळे अ‍ॅप डिलीट करण्यास सांगितले

देश-विदेश : अमेरिकेत सरकारी उपकरणांवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) च्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याने (सीएओ) एक आदेश जारी केला ज्यामध्ये म्हटले आहे की, ‘व्हॉट्सअ‍ॅप आता कोणत्याही सरकारी उपकरणावर वापरता येणार नाही. यामध्ये अ‍ॅपच्या तिन्ही आवृत्त्या समाविष्ट आहेत – मोबाइल, डेस्कटॉप आणि वेब.’

या अधिसूचनेत म्हटले आहे की, जर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केलेले असेल तर ते ताबडतोब डिलीट करावे. एवढेच नाही तर, अज्ञात नंबरवरून येणाऱ्या मेसेजेस किंवा फिशिंग स्कॅमपासून सावध राहण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे. या आदेशात कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपऐवजी इतर मेसेजिंग अ‍ॅप्स वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टिकटॉक सारख्या अ‍ॅप्सवर व्हाईट हाऊसने बंदी घातली आहे.

टिकटॉक सारख्या अ‍ॅप्सवर व्हाईट हाऊसने बंदी घातली आहे.

बंदीचे कारण काय आहे?

आदेशात असे म्हटले आहे की सायबर सुरक्षा कार्यालयाने व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​ला ‘उच्च-जोखीम’ अ‍ॅप मानले आहे. यामागे 3 प्रमुख कारणे देण्यात आली…

  • डेटा संरक्षणात पारदर्शकतेचा अभाव: व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​ वापरकर्त्यांचा डेटा कसा संरक्षित केला जातो हे स्पष्ट करत नाही. म्हणजेच, तुम्ही पाठवलेल्या संदेशांचे काय होते हे पूर्णपणे स्पष्ट नाही.
  • संग्रहित डेटा एन्क्रिप्शनचा अभाव: जरी WhatsApp संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्ट केलेले असले तरी, संग्रहित डेटामध्ये एन्क्रिप्शनचा अभाव असतो. यामुळे डेटा लीक होण्याचा धोका असू शकतो.
  • सुरक्षेचा धोका: व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​ वापरकर्त्यांचा डेटा हाताळण्याच्या पद्धतीत काही त्रुटी आहेत, ज्यामुळे सायबर हल्ल्याचा धोका निर्माण होतो.

या वर्षी जानेवारीमध्ये सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले होते

या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​ने स्वतः कबूल केले होते की इस्रायली स्पायवेअर कंपनी पॅरागॉन सोल्युशन्सने त्यांच्या अनेक वापरकर्त्यांना, विशेषतः पत्रकारांना आणि नागरी समाजातील सदस्यांना लक्ष्य केले होते. या घटनेने व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मेटा काय म्हणतो?

मेटाने या बंदीचा निषेध केला आहे. कंपनीचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आम्ही या निर्णयाशी पूर्णपणे सहमत नाही. व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​मध्ये डीफॉल्ट एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे, जे ते इतर मेसेजिंग अ‍ॅप्सपेक्षा अधिक सुरक्षित बनवते.”

मेटाचा दावा आहे की व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​ची सुरक्षा पातळी सभागृहाने पर्याय म्हणून सुचवलेल्या अ‍ॅप्सपेक्षा चांगली आहे. स्टोन यांनी असेही म्हटले आहे की हाऊस आणि सिनेटमधील अनेक सदस्य व्हॉट्सअ‍ॅप वापरतात आणि त्यांना हाऊसच्या सदस्यांनीही अधिकृतपणे ते वापरावे अशी त्यांची इच्छा आहे.

अमेरिकेतही या अ‍ॅप्सवर बंदी आहे

  • २०२२ मध्ये, चिनी मूळ कंपनी बाईटडान्सशी असलेले कनेक्शन आणि डेटा सुरक्षेच्या चिंतेमुळे टिकटॉकला कर्मचाऱ्यांच्या उपकरणांमधून देखील काढून टाकण्यात आले.
  • हाऊसने डीपसीक आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट सारख्या एआय प्रोग्रामवर काही निर्बंध लादले आहेत.
  • ChatGPT च्या मोफत आवृत्तीवरही बंदी घालण्यात आली आहे आणि फक्त सशुल्क आवृत्ती (ChatGPT Plus) वापरण्याची परवानगी आहे.

भारतात ४८ कोटींहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आहेत

भारतात व्हॉट्सअ‍ॅप​​​​​​​चे सुमारे ४८.९ कोटी वापरकर्ते आहेत. जगभरात त्याचे २ अब्जाहून अधिक वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअ‍ॅप २००९ मध्ये लाँच झाले. २०१४ मध्ये फेसबुकने १९ अब्ज डॉलर्सना व्हॉट्सअ‍ॅप विकत घेतले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘इठा’ चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

0
पुणे: 'इठा' चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!