Homeमहाराष्ट्रभैरप्पांच्या तोडीचा कादंबरीकार मराठीत अजूनही नाही:ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांचे पुण्यातील परिसंवादात...

भैरप्पांच्या तोडीचा कादंबरीकार मराठीत अजूनही नाही:ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांचे पुण्यातील परिसंवादात मत

ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांनी मराठी साहित्यात कन्नड कादंबरीकार डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या तोडीचा कादंबरीकार अजूनही झालेला नाही, अशी खंत व्यक्त केली. विवेक व्यासपीठ, विवेक साहित्य मंच आणि विदिशा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका परिसंवादात त्या बोलत होत्या. हा परिसंवाद दिवंगत कन्नड कादंबरीकार डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या साहित्यिक योगदानाला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार श्रीधर लोणी, मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापिका डॉ. रूपाली शिंदे आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. ‘भैरप्पांच्या साहित्याचा अनुवादः मुक्त संवाद’ या सत्रात शिक्षण विवेकच्या संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली. श्रीधर लोणी यांनी ‘भैरप्पा यांच्या साहित्यातील सामाजिक जाणिवा’ या विषयावर, तर डॉ. रूपाली शिंदे यांनी ‘भैरप्पा यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा’ या विषयावर विशेष मांडणी केली. उमा कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या टप्प्यांमधून कन्नड कादंबरी विकसित झाली आणि भैरप्पांनी या सर्व टप्प्यांवरील कादंबऱ्या वाचकांसमोर ठेवल्या, ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे. ‘वंशवृक्ष’ ही मी अनुवादित केलेली भैरप्पांची पहिली कादंबरी होती, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. येथूनच लेखक आणि अनुवादक म्हणून त्यांचे ऋणानुबंध जुळले आणि भविष्यात त्याचे उत्तम स्नेहात रूपांतर झाले. भैरप्पांचे पहिले प्रेम भारतीय शास्त्रीय संगीतावर होते. त्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकताना त्यांची सर्जनशीलता अधिक बहरून येत असे. त्यांच्या लेखनात शास्त्रीय संगीताची वैशिष्ट्ये दिसून येतात. कादंबरी लेखनावरील त्यांची हुकूमत शास्त्रीय संगीताप्रमाणे लय, ताल आणि आलापीसारखी सुरेल आहे. यामुळे त्यांच्या निवेदनात एक ठहराव जाणवतो. भैरप्पांनी त्यांच्या लेखनातून मांडलेली मूल्यव्यवस्था भारतीय होती. कुलकर्णी म्हणाल्या की, साहित्य गांभीर्याने घेतल्याने भैरप्पांच्या या मूल्यांचा काही प्रमाणात परिणाम त्यांच्या व्यक्तिगत जीवनशैलीवर झाला, कारण त्यांच्या लेखनातून त्यांना मूल्यांची दुसरी बाजू देखील समजली. ते मूल्य संवेदना मानतात आणि ती संवेदना पक्की असते, जी प्रत्येक वेळी वर दिसत नसली तरी ती अस्तरासारखी असते.भैरप्पा गेल्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन मला नाशिकमध्ये करता आले. यानिमित्ताने मला ऋषीऋण फेडता आले, असे मी मानते. यावेळी बोलताना दिलीप करंबेळकर म्हणाले की, तत्त्वज्ञान या विषयाचा भैरप्पा यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या कादंबऱ्यांमधून या तत्वज्ञानाची मूल्यात्मक मांडणी झालेली आहे. मात्र, या मांडणीमुळे त्यांच्या कादंबऱ्या किचकट झाल्या नाही, तर वाचनीय झाल्या. ही त्यांच्या कादंबरी लेखनाची ताकद आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!