Homeमहाराष्ट्रअमरावतीत एकाच रात्री 5न्यायाधीशांच्या घरांसह चार कोर्ट कर्मचाऱ्यांची घरे फोडली:नऊ घरांना चोरट्यांनी...

अमरावतीत एकाच रात्री 5न्यायाधीशांच्या घरांसह चार कोर्ट कर्मचाऱ्यांची घरे फोडली:नऊ घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्यामुळे पोलिसांच्या रात्र कर्तव्यावरच प्रश्नचिन्ह

शहरातील कांतानगर परिसरात न्यायाधिश तसेच न्यायालयीन कर्मचारी, अधिकाऱ्यांचे शासकिय निवासस्थान आहेत. याच निवासस्थान परिसरात चोरट्यांनी शनिवार ते रविवारी (दि. १५) मध्यरात्री दरम्यान पाच न्यायाधीशांच्या घरांसह चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कुलूप बंद घरांना

.

या नऊ घरातून चोरट्यांनी ९० ते ९५ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे न्यायाधीशांच्या निवासस्थान परिसरात रात्र सुरक्षेसाठी दोन ठिकाणी चार पोलिस तैनात होते. तरीही चोरट्यांनी मागील बाजूने प्रवेश करुन या चोऱ्या केल्या आहेत. कांतानगर भागात एकाच परिसरात येथील जिल्हा न्यायाधीशांसह विवीध न्यायाधीशांच्या शासकिय वसाहती आहेत. त्याच वसाहतींना लागून एका न्यायालयीन कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. शनिवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजताच्या सुमारास पैनगंगा इमारतीत दोन न्यायाधीशांच्या बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य करुन ते फोडले. त्यानंतर याच इमारतीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या नल दमयंती इमारतीत दोन आणि शहानुर इमारतीत एक अशा पध्दतीने एकूण पाच न्यायाधीशांच्या घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. तसेच बाजुच्या इमारतीमधील कर्मचाऱ्यांचेही घरे चोरट्यांनी फोडली.

पोलिसांच्या तंबूपासून ५० फुट अंतरावरून गेले चोर पैनगंगा व इतर दोन वसाहती असलेल्या कॅम्पसमध्ये रात्रीच्या वेळी दोन पोलिस कर्तव्यावर हजर होते. पोलिसांचा तंबू ज्या ठिकाणी लावलेला आहे, त्या तंबूपासून ५० ते ६० फुट अंतरावरून चोर पैनगंगा इमारतीत शिरले आणि बाहेर निघाले. मात्र तंबूत असलेल्या दोन्ही पोलिसांना त्यांची चाहूल लागली नाही मात्र ज्यावेळी आवाज आला त्यावेळी एका पोलिसाला चोरटा भिंतींवरून उडी मारुन झाडाझुडपात जाताना दिसला मात्र पोलिस भिंतीजवळ जाईपर्यंत चोरट्यांनी पोबारा ठोकला होता. तसेच नल दमयंती आणि शहानुर यात असलेल्या कॅम्पसमध्ये गार्ड रुम समोरच्या बाजूने आहे. त्या ठिकाणी सुध्दा दोन पोलिस कार्यरत होते. मात्र चोरटे मागच्या बाजूने येवून चोरी करुन निघून गेलेत, समोर गार्डरुममधील पोलिसांना याबाबत साधी चाहूलही लागली नाही.

सुट्टीच्या दिवशी हात साफ यामध्ये एका न्यायाधीशांच्या घरातून घड्याळ, एका घरातून दहा हजारांची रोख तर काही ठिकाणाहून चांदी व सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. ज्या न्यायाधीशांच्या घरात व कर्मचाऱ्यांकडे चोरी झालेली आहेत. ते रविवारची सुटी असल्यामुळे घरी नव्हते. नेमका याच संधीचा चोरट्यांनी फायदा घेतला आहे. चोरी झाल्याची माहीती मिळताच पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्यासह तिनही पोलिस उपायुक्त्, गुन्हे शाखेचे अधिकारी व पथक, गाडगेनगर ठाण्याचे पोलिस सुध्दा घटनास्थळी पोहोचले होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!