Homeमहाराष्ट्रThackeray Sena BMC Elections | Uddhav Orders 300 Voter Visits Daily |...

Thackeray Sena BMC Elections | Uddhav Orders 300 Voter Visits Daily | Shiv Sena Campaign | शिवसेना सोडून गेलेल्यांना जागा दाखवण्याची वेळ: मुंबई पालिकेसाठी अंग झटकून कामाला लागा; उद्धव ठाकरेंच्या शाखा प्रमुखांना सूचना – Mumbai News

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तयारीला लागली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईतील सेना भवन येथे शाखा प्रमुखांची बैठक पार पडली. शिवसेना सोडून गेलेल्य

?

मुंबई महापालिका हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मागील 20 ते 25 वर्षांपासून पालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला जनाधार पाहता यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायच्या की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. त्यातच ठाकरे गट महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे या बैठकीतून दिसून आले.

शाखा प्रमुखांनी अंग झटकून कामाला लागावे

मुंबईतील शिवसेना भवनात रविवारी पक्षाच्या शाखा प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना मोठी घोषणा केली. येत्या काळात शाखा प्रमुखांनी अंग झटकून कामाला लागावे. त्यासाठी दररोज 300 घरातील मतदारांची भेट घेण्याचे लक्ष्य ठेवावे. त्यानुसार दिवसभराच्या कामाचे नियोजन करावे. त्यासोबतच पक्षाने केलेले काम या मतदारांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवावा. त्यामुळे निवडणूक काळातील सर्व कामे आतापासून पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांना दिल्या आहेत.

सोडून गेलेल्यांना जागा दाखवण्याची वेळ

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागण्याच्या सूचना करताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले. शाखा प्रमुखांनी कामाचे नियोजन करीत असताना त्यांच्याकडील काही जबाबदारी शाखा समनव्यकाकडे पोहचवावी. त्यासोबतच प्रभागातील प्रत्येकाशी सर्वांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना सोडून गेलेल्या मंडळींना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा…

बाळासाहेब गेल्यानंतर आम्हाला आपलेपण दिसले नाही:केंद्रीय मंत्रीपद जाधवांना देत एकनाथ शिंदेंनी मोठेपणा दाखवला- भरत गोगावले

बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांचे दैवत होते. बाळासाहेब ठाकरे यांची काम करण्याची जी काय पद्धत होती, ती उद्धव ठाकरेंमध्ये आम्हाला दिसून आली नाही. बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले की ते आपलेपणाने विचारपूस करत होते, त्यांच्यानंतर ती आपलेपणाची भावना जानवली नाही अन् त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली, असे शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तेलंगणा हत्याकांडातील आरोपी राजकुमार मृत सापडला; POCSO प्रकरणातील संशयित

0
हैदराबाद7 तासांपूर्वीलिंक कॉपी करातेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सहा लोकांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी पी राजकुमार सोमवारी मृत अवस्थेत आढळला. पोलिसांना त्याचा मृतदेह कोठूर पोलीस ठाण्याच्या...

पालखी मिरवणुकीसाठी सातारा पोलिसांचा सुरक्षा आराखडा; 2700 अधिकारी तैनात

0
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. १५ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणारी...

अखिलेश यांच्या वकिलांची भाजप खासदाराने मागितली माफी:’टिन्नू टीपूसोबत बोलत होता’ असे म्हटल्याबद्दल म्हणाले- बदनामी...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरीचा आरोपी टिन्नू यादव याच्यावरून अखिलेश यादव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. भाजप...

13 जुलैचे राशिभविष्य:सिंह राशीच्या नोकरदार लोकांना प्रगतीची शक्यता, कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा...

0
13 जुलै, सोमवार रोजी सिंह राशीच्या नोकरदार लोकांना चांगल्या कामामुळे पदोन्नती मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांचे थांबलेले उत्पन्न पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे....
spot_img

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...

Itel A100 Pro लाँच भारतात

0
नवी दिल्ली7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक ब्रँड आयटेलने भारतात नवीन बजेट स्मार्टफोन 'आयटेल A100 प्रो' लॉन्च केला आहे. हा या वर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या A100...
error: Content is protected !!