Homeमहाराष्ट्रसुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला:दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारही भेटले, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना...

सुनील तटकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला:दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारही भेटले, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणि नेत्यांमधील सुप्त संघर्षाची चर्चा सुरू असतानाच, राज्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी घडली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच खासदार पार्थ पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची घेतली होती. त्यानंतर आता थेट प्रदेशाध्यक्षच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचल्याने महायुतीच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचे सविस्तर वृत्त अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि आज सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे, “राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय?” असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या भेटींमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक आयोगाच्या पत्राने वाढवला होता सस्पेन्स! या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला दिलेल्या एका पत्राशी जोडलेली आहे. राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात अनेक दिग्गज नेत्यांच्या अधिकृत पदांचा उल्लेखच गायब होता. या यादीत सुनील तटकरे यांच्या नावापुढे ‘प्रदेशाध्यक्ष’ आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे ‘कार्याध्यक्ष’ असा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला. हा घोळ समोर येताच पक्षात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पक्षाने तातडीने निवेदन जारी करत “सुनील तटकरे हेच प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल हेच कार्याध्यक्ष पदावर कायम राहतील,” अशी सारवासारव केली होती. पक्षात कोणतीही चलबिचल नाही! दरम्यान, या संपूर्ण वादावर आणि नाराजीच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पक्षाची अधिकृत बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळले आहेत. “राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की, पक्षात कोणतीही चलबिचल किंवा कोणतीही नाराजी नाही. काही लोक जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवत आहेत. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार वहिनीसाहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि सुनील तटकरे साहेब हे सर्व पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि पक्षात एकजूट आहे. ज्या माध्यमांमध्ये वादाच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, त्या जाणीवपूर्वक पेरल्या गेल्या असून पूर्णपणे निराधार आहेत,” असे सुरज चव्हाण म्हणालेत. नव्या पिढीच्या वर्चस्वामुळे ज्येष्ठ नाराज? बारामती पॅटर्नमध्ये जनरेशन गॅप : पटेल व तटकरेंना बाजूला सारून पार्थ व जय पवारांकडे सूत्रे सोपवली जाणे, हा पक्षात असंतोषाचा केंद्रबिंदू आहे. नव्या पिढीच्या वाढत्या वर्चस्वामुळे नाराज ज्येष्ठ नेत्यांची शांतता चिंतेची बाब ठरू शकते. बायपास डिप्लोमसी: पटेल-तटकरे समर्थकांमधील असंतोष व पक्षांतर्गत संघर्षावर सुनेत्रा पवार यांच्याशी बोलणे २ ज्येष्ठ नेत्यांनी टाळले, त्याऐवजी महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मध्यस्थीचा मार्ग निवडला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!