Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत:सुनील शेळकेंच्या विधानाने खळबळ; सुनील तटकरेंनी मांडली...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत:सुनील शेळकेंच्या विधानाने खळबळ; सुनील तटकरेंनी मांडली पक्षाची भूमिका

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असेल, तर विलीनीकरणासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असे सूचक विधान शेळके यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, आमदार सुनील शेळके पुणे जिल्ह्यातील प्रभावी नेते आणि तरुण आमदार आहेत. अजितदादांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीने काम केले आहे. मोठ्या फरकाने ते मावळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी जी भावना व्यक्त केली ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे यासंदर्भातील माहिती होती, मला कल्पना नाही. अंतिम निर्णय वहिनीच घेतील पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्त्वात पुढील काळात पक्षाचे काम सुरु राहावे, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. मनावर प्रचंड मोठा आघात होऊनही ज्या पद्धतीने वहिनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संयमाने आणि सोशिकतेने कारभार करत आहेत. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. सुनील शेळके यांनी विलिनीकरणाबाबत जे काही म्हटले आहे, त्याबाबत चर्चा सुरु आहे का, मला माहिती नाही. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय वहिनीच घेतील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने राष्ट्रवादी पक्षाच्या कारभारात हस्तक्षेप केला नाही भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विलीनीकरण अडले आहे का? असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, भाजपकडून कधी विलीनीकरणाबाबत दबाव राहिलेला नाही. ज्यावेळी आम्ही अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या घडामोडी सर्वांनी पाहिल्या आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीत कधीही हस्तक्षेप केलेला नसल्याचे तटकरे यांनी सांगितले. भाजपचा दबाव असण्याचा प्रश्न नाही तसेच भाजपच्या केंद्र आणि राज्य नेतृत्त्वाने आम्हाला नेहमीच मित्रपक्ष म्हणून सन्मानाची वागणूक दिली आहे. त्यामुळे भाजपचा दबाव असण्याचा प्रश्न नाही. प्रश्नांतर्गत आमचा विलीनीकरणाबाबत आमचे म्हणणे असण्याचे कारण नाही, यासंदर्भातील निर्णय वहिनीच घेतील. या क्षणाला माझ्याकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. पण ज्येष्ठ आमदार सुनील अण्णा कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे, हे मला माहिती नाही. त्यामुळे मला या विषयावर मत व्यक्त करायचे नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सर्व मुद्दे केवळ ‘जर-तर’च्या शक्यतांवर आधारित सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांच्या संमतीनेच घेण्यात आली असून, त्यानंतर पक्षाच्या विलीनीकरणाच्या विषयावर पूर्णपणे पडदा पडला आहे, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचा दीर्घकाळ प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळताना आणि अजितदादांसोबत महाराष्ट्रभर दौरा करताना विलीनीकरणाबाबत पुन्हा कधीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या चर्चिले जाणारे हे सर्व मुद्दे केवळ ‘जर-तर’च्या शक्यतांवर आधारित असल्याने, यावर आता अधिक भाष्य करणे अनावश्यक असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!