नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर-नागपूर महामार्गावरील फेटरी गावातील ओयो हॉटेलमध्ये 22 जानेवारी रोजी एका तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात फरार असलेला आरोपी सौरभ जामगडे याला पोलिसांनी भोपाळ येथे तेलंगणा एक्सप्रेसमधून अटक केली आहे. रुचिता राजेश भांगे (वय 21, रा. बोरगाव, नागपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये रुचिता आणि आरोपी सौरभ जामगडे यांच्यात वाद झाला. या वादातून सौरभने रुचिताच्या गळ्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर आरोपीने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून घटनास्थळावरून पळ काढला होता. या घटनेनंतर कळमेश्वर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार पथके तयार केली होती. आरोपी सतत पोलिसांना हुलकावणी देत होता. घटनेच्या दिवशी तो पुण्याकडे गेल्याची माहिती मिळाल्याने पथके पुणे व पिंपरी चिंचवड येथे रवाना करण्यात आली होती. त्यानंतर 29 जानेवारी रोजी तो मोदा तालुक्यातील महालगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस महालगावकडे जात असतानाच, आरोपी नागपूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या तेलंगणा एक्सप्रेसने निघाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ भोपाळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. अखेर, भोपाळ येथे तेलंगणा एक्सप्रेसमध्ये सौरभ जामगडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याला नागपूरला आणून कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कळमेश्वर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी (PCR) सुनावली आहे.
Source link
नागपुरात ओयो हॉटेलमधील तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक:सौरभ जामगडे तेलंगणा एक्सप्रेसमधून भोपाळमध्ये पोलिसांच्या ताब्यात
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























