राज्यात हवामानाचा मोठा विरोधाभास पाहायला मिळत असून, एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सोलापूर, पंढरपूर, परभणी आणि इंदापूरसह अनेक भागांत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. वेगवान वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यात रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला असून, कांदलगाव, सरडेवाडी, शहा, हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. कासेगावात झाडावर वीज पडली पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, तालुक्यातील कासेगाव येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंबासारख्या फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. खर्डीत एकाच दिवसांत 4 वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळली पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात एकाच दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे. बनकर माळी वस्ती येथील उसाच्या शेतावर वीज पडल्याने पिकाने पेट घेतला, तर मुस्लिम कब्रस्तान परिसरातील कडबा आणि जळकेवाडी येथील नारळाचे व आंब्याचे झाड वीज कोसळून जळून खाक झाले. गेल्या दोन दिवसांत या परिसरात एकूण पाच वेळा वीज पडल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, निसर्गाच्या या प्रकोपाने खर्डी परिसरात चिंतेचे सावट पसरले आहे. परभणीत वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी परभणी जिल्ह्यात दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर संध्याकाळी वातावरणात अचानक नाट्यमय बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने परभणीकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा दिला असला, तरी बळीराजाच्या चिंतेत मात्र मोठी भर घातली आहे. फळबागा आणि इतर पिकांना या पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचे व सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसासह गारपीट सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर आणि दर्शनाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः दर्शनाळ येथील शेतकरी अर्जुन गाडेकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने साठवलेला गहू, ज्वारी आणि कांदा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. अनेक भागांत काढून ठेवलेली पीके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
Source link
राज्यातील हवामानात मोठा बदल:सोलापूर, इंदापूर आणि परभणीत पावसाचा धुमाकूळ; विविध ठिकाणी विजा कोसळल्या
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....
सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...
गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...
स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...
‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....
सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...































