Homeमहाराष्ट्रशिवसेनेचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलली; असीम सरोदे यांचा चार आठवडे...

शिवसेनेचा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलली; असीम सरोदे यांचा चार आठवडे विलंबाचा दावा


शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली. ही सुनावणी परवा म्हणजे शुक्रवारी 23 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे. पण विधिज्ञ असीम सरोदे यांनी ही सुनावणी शुक्रवारी होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा दाव

.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठापुढे आज शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हाशी संबंधित वादावर सुनावणी होणार होती. हे प्रकरण कोर्टात 37 व्या क्रमांकावर लिस्टेड होते. त्यावर सकाळच्या सत्रात 11.30 वाजता सुनावणी सुरू होऊन ती सलग 2 दिवस चालणे अपेक्षित होते. पण आज अचानक कोर्टापुढे अरावली पर्वतरांगांचे प्रकरण आले. कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करण्यासाठी दुपारी 1 ची वेळ निश्चित केली. परिणामी, गत 3 वर्षांपासून कोर्टात खितपत पडलेले सत्तासंघर्षाचे प्रकरण असेच पुढे ढकलण्यात आले.

प्रकरणावर 4 आठवड्यांनी होणार सुनावणी -असीम सरोदे

यासंबंधीच्या वृत्तानुसार, शिवसेना व राष्ट्रवादीशी संबंधित या प्रकरणावर येत्या शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण असीम सरोदे यांनी हा दावा जोरकसपणे फेटाळले आहे. तसेच हे प्रकरण सतत लांबणीवर टाकले जात असल्यावर नाराजीही व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयातील सत्ता संघर्ष सुनावणी पुढे ढकलली जाणार हे मला कालच माहिती असल्याने मी आज दिल्लीला गेलो नव्हतो.

शिवसेना सत्तासंघर्ष प्रकरणामध्ये कोणतीही नक्की तारीख दिलेली नाही. कुणीतरी पसरविले की 23 जानेवारी या तारखेला सुनावणी आहे. मला सुद्धा एका कार्यक्रमात असताना हीच काही चॅनेल वरील चुकीची माहिती कळली. परंतु याप्रकरणात कोणतीही तारीख अजून दिलेली नाही. चार आठवड्यांनी कोणतीतरी तारीख होईल.

कृपया याची नोंद घ्यावी की तारखेबाबत विनंती ऐकून घेण्यास सुद्धा सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि फॉर विक्स असे म्हणून कोर्टाचे कामकाज संपले. त्यामुळे नक्की तारीख व्हायची आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. असीम सरोदे यांच्या या विधानामुळे शिवसेनेच्या पुढील सुनावणीविषयी साशंकता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा…

शिवसेना-राष्ट्रवादी पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर:सुप्रीम कोर्ट आता शुक्रवारी करणार फैसला!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!