Homeमहाराष्ट्रSant Namdev Palkhi Procession Begins from Narsi Namdev, First Ringan in Hingoli...

Sant Namdev Palkhi Procession Begins from Narsi Namdev, First Ringan in Hingoli | संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान: मंगळवारी हिंगोलीत पहिले रिंगण होणार, तीनशे पेक्षा अधिक वारकरी सहभागी – Hingoli News

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले असून या पालखी सोहळ्यात सुमारे ३०० पेक्षा अधिक वारकरी सहभागी झाले आहेत. मंगळवारी ता. १७ हिंगोलीत पहिले गोल रिंगण होणार आहे.

?

संत नामदेव महाराज संस्थान येथे सोमवारी ता. १६ दुपारी तीन वाजता पालखीचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार गजानन घुगे, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, द्वारकादास सारडा, भागवत सोळंके, शशीकांत गवते, ज्ञानेश्‍वर किर्तनकार यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर गावात प्रदक्षिणा घेण्यात आली असून पालखीचा आजचा मुक्काम नर्सी नामदेव गावातच झाला आहे.

दरम्यान, मंगळवारी ता. १७ सकाळी सात वाजता पालखी घोटा, सवड, केसापूर मार्गे दुपारी चार वाजता हिंगोलीत पोहोचणार आहे. हिंगोली येथील महाराजा अग्रसेन चौकात पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत केले जाणार असून यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेली पालखी रामलिला मैदानावर आल्यानंतर त्या ठिकाणी पहिले गोल रिंगण होणार आहे. पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मंगळवारी ता. १७ हिंगोलीत मुक्कामी थांबलेला पालखी सोहळा बुधवारी ता. १८ औंढा नागनाथ, गुरुवारी ता. १९ बाराशिव, ता. २० जून हट्टा मार्गे पालखी सोहळा ता. २१ जून रोजी परभणी जिल्हयात पोहोचणार आहे. यापालखी सोहळ्यात परभणी पासून सुमारे एक हजार पेक्षा अधिक भाविक सहभागी होणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा…

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय:वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी, शासन निर्णय जारी; 18 जून ते 10 जुलै दरम्यान लागू

पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर ही टोलमाफी देण्यात आली आहेत. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!