Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:'ऑपरेशन टायगर'नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

‘ऑपरेशन टायगर’च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची भेट झाली होती. त्यानंतर आता शिंदे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली असतानाच हा दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीचा दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यामुळे हा दौरा आगामी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या विस्तारात कामगिरी समाधानकारक नसलेल्या काही केंद्रीय मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याच वेळी शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी? केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील नेत्यांना महत्त्वाचे स्थान मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये श्रीकांत शिंदे, उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या 6 बंडखोर खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. मे महिन्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरे गटातून आलेले 6 खासदार सुद्धा अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीत ते मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे. हे ही वृत्त वाचा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!:राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची पोकळी:प्रफुल्ल पटेल म्हणाले- राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सुधारणा गरजेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. उपमुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, राजकीयदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी पक्षाने आवश्यक सुधारात्मक पावले उचलली पाहिजेत, असे पटेल यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!