Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंसोबत मतभेद नाहीत:राज्यसभेचा खासदार किंवा मंत्री व्हायला पक्षात आलो नाही, 3...

आदित्य ठाकरेंसोबत मतभेद नाहीत:राज्यसभेचा खासदार किंवा मंत्री व्हायला पक्षात आलो नाही, 3 लीटर रॉकेल म्हणजे अंधभक्तांसाठी तीर्थच- संजय राऊत

माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरेंमध्ये कसले मतभेद आहेत, या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. मी शिवसेनेमध्ये जन्मापासून आहे. पक्षात काही राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मी आलो नाही, मंत्री होण्यासाठी आलो नाही. बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्रात नेण्यासाठी काम करतो, मी स्वत:ला एक शिवसैनिक मानतो, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, एखाद्या पदाचा केव्हा तरी निरोप घ्यावा लागतो. त्यांची मानसिक तयारी आपण ठेवली पाहिजे. आम्हाला वाटले होते उद्धव ठाकरे अजून 15 वर्षे मुख्यमंत्री असावे पण तसे झाले नाही. आमच्या पक्षावर जे संकट आहे फोडाफोडीचे आमचा पक्ष वाढवण्याचे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार नव्हते हे समजून घेतले पाहिजे. 2029 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी उबाठा कधीही सोडणार नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार संजय राऊत म्हणाले की, नामवंत लोकं बुआबाजीला प्रतिष्ठा देण्याचे काम करतात. सामान्य माणूस बुआबाजीला प्रतिष्ठा देत नाही. उद्योगपती, आमदार, खासदार, सत्ताधारी, मंत्री हे लोकं त्यांना प्रतिष्ठा देतात, ते पुजा आणि अघोरी कृत्य करतात. पण यासाठी एका पक्षाला दोष देऊन काही फायदा नाही, हा सर्वपक्षीय अत्याचार आहे. भोंदू गिरी, बुआबाजीवर मी कधी बोलत नाही संजय राऊत म्हणाले की, भोंदू गिरी, बुआबाजी यावर मी कधी बोलत नाही. राज्यकर्त्यांनी अशा भोंदू बाबाच्या नादाला लागू नये असे माझे मत आहे. सध्या दिसतंय की खरातला महान बनवण्यासाठी आताच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातील मंत्र्यांचा वाटा आहे. जे संविधानिक पदावर आहेत त्यांनी अशा गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. आपण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरता त्यांनी अशा भोंदूगिरीला नेहमीच दूर ठेवले आहे, असे म्हणत शिंदेंवर निशाणा साधला. रॉकेल हे अंधभक्तासाठी तीर्थच संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशाचे जे मित्र होते ते मित्र आपण गमावले आहेत. अशावेळी मोदींना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावे लागत आहे. पण त्यासाठी 27 दिवस का लागले, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करत आहे. दुसरीकडे जनता रॉकेलच्या रांगेत उभी आहे. या बैठकीतून काय होणार याकडे पाहावे लागेल. 3 लीटर रॉकेल हे अंधभक्तासाठी तीर्थच आहे. ते काही सरकारवर टीका करणार नाही. देशावर ही अवकाळा मोदींच्या चुकलेल्या निर्णयामुळे आली आहे. दिल्लीत एक आठवड्याचा सुद्धा साठा नाही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, खरात तर जेलमध्ये आहे, पण दुसरे कोणी महाराज असतील तर सरकारचा हात दाखवून राज्यात काय सुरू आहे हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे, असा उपहासात्मक टोला लगावला आहे. देशभरातील लोकं पेट्रोल-डिझेलसाठी रांगेत उभी आहेत, ही भीती मोदींनी निर्माण केली आहे. 3 लीटर रॉकेल देणार म्हणून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. चीन-फ्रान्ससारख्या देशात साधारण 4 महिन्याचा पेट्रोल-डिझेल साठा आहे.
आपल्याकडे दिल्लीत एक आठवड्याचा सुद्धा साठा नाही. हे जनतेला सांगू नये. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले ही चांगली गोष्ट आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!