जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, 18 जानेवारीला अध्यक्षपदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने आपला अध्यक्ष स्वबळावर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या भाजपचे संख्याबळ 26 वर पोहोचले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 32 चा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या काही सदस्यांशी गुप्त चर्चा सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 2017 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत त्यांना सत्तेपासून दूर ठेवले होते, त्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने आता सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या 63 जागांपैकी भाजपचे 23 उमेदवार निवडून आले आहेत. 2 भाजप पुरस्कृत जिंकले आहेत. 2 दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने हे संख्याबळ आता 26 झाले आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी 6 सदस्यांची गरज आहे. हे संख्याबळ जुळवण्यासाठी भाजपने महाविकास आघाडीच्या गोटात शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि उबाठा गटातील काही असंतुष्ट सदस्यांना खेचण्यासाठी भाजपकडून विविध स्तरांवर चर्चा केली जात आहे. 2017 मध्ये शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. मात्र, घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता लक्षात घेता, आगामी काही दिवस जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहेत. शिंदेसेनेकडून भाजपला सहकार्याची आशा छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपने 115 पैकी 57 जागांवर विजय मिळवला. पक्षाला बहुमतासाठी एका सदस्याची गरज होती. त्या वेळी काही अपक्षांनी संपर्क साधल्याचे भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मनपामध्ये भाजप शिवसेनेला सोबत घेणार की नाही, असा प्रश्न समोर आला होता. स्वबळावर लढलेल्या मनपात युती होणार नाही, असे वक्तव्य पक्षाच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी केल्यानंतर संभाजीनगरमध्ये भाजप सत्तेमध्ये शिंदेसेनेला वाटा देणार की नाही, याविषयी चर्चा सुरू झाली. मात्र, राज्यात युती असल्याने मनपातही एकत्र येऊ, असे पक्षाने सुरुवातीलाच जाहीर केले. त्यानंतर भाजपने मनपात उपमहापौरपद शिवसेनेला दिले. या पार्श्वभूमीवर जि. प.मध्ये मोठा पक्ष असलेल्या भाजपला शिवसेना सहकार्य करेल. मनपात सत्तेत वाटा दिल्याचा शिवसेनेला विसर पडणार नाही, अशी भाजपला अपेक्षा आहे. अध्यक्ष, सभापतिपदांसाठी ‘लॉबिंग’ जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचाली वेगवान झाल्या असतानाच, अध्यक्ष आणि सभापतिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी अनेक सदस्यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुंबईवारी वाढवली असून, आपापल्या गॉडफादरमार्फत लॉबिंग सुरू केले आहे. अनुभव आणि पक्षनिष्ठा यांचे दाखले दिले जात असून, ऐनवेळी कुणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपकडून दबावतंत्राचा वापर भाजप मोठा पक्ष असतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अगोदर अडीच वर्षे अध्यक्षपद हवे आहे. भाजप पहिल्या टर्ममध्येच अध्यक्षपद घेण्यावर ठाम आहे. यामुळे भाजप आता अपक्ष आणि इतर पक्षांना सोबत घेऊन शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर करत आहे. भाजपचे संख्याबळ जास्त झाल्यास शिवसेनेला कमी महत्त्वाच्या सभापतिपदांवर समाधान मानावे लागेल.
Source link
संभाजीनगर जि.प.मध्ये स्वबळासाठी भाजपचा राष्ट्रवादी, उबाठाच्या सदस्यांना गळ:सत्तेत वर्चस्व राखण्यासाठी सदस्य संख्या वाढवण्याचा प्रयत्न
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























