उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याऐवजी झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. शहरात विदेशी हायड्रो गांजाची विक्री करणाऱ्या राजवीर चरणसिंग बिराग (20, रा. सिडको एन-4) आणि ओम रवींद्र शिंदे (23, रा. एन-4, भगतसिंग कॉलनी) या दोघांकडून 29 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला ओम हा एमबीए पदवीधर आहे, तर राजवीर पुण्यात इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. यातील एकाचे वडील वकील असून दुसरे शासकीय विभागात लिपिक आहेत. सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुणांनी अमली पदार्थांच्या या काळ्याबाजारात पाऊल ठेवल्याने पोलिस दलासह शहरात खळबळ माजली आहे. निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली असून आरोपींना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गांजा विक्रीसाठी स्नॅपचॅट मेसेजींग ॲपचा आधार तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, हे तरुण गांजा विक्रीसाठी स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपचा वापर करत होते. या ॲपवर केलेले चॅटिंग आणि फोटो पाहिल्यानंतर आपोआप नष्ट होतात, ज्यामुळे पोलिसांना पुरावा सापडणार नाही, असा त्यांचा समज होता. स्नॅपचॅट स्टोरी आणि ग्रुप्सच्या माध्यमातून ते शहरातील हायप्रोफाइल तरुणांच्या संपर्कात होते. या गुन्ह्यात आठ जणांची टोळी सक्रिय असून उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
Source link
संभाजीनगरात सोशल मीडियाचा नशेसाठी वापर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडून गांजाची तस्करी:इंजिनिअर, एमबीएच्या तरुणांकडून 285 ग्रॅम 29 लाखांचा विदेशी हायड्रो गांजा जप्त
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























