Homeमनोरंजनमहिला स्वच्छता कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाने रजनीकांत खुश:घरी बोलावून सोन्याची साखळी घालून सन्मानित केले,...

महिला स्वच्छता कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाने रजनीकांत खुश:घरी बोलावून सोन्याची साखळी घालून सन्मानित केले, फोटो व्हायरल

सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या उदार स्वभावासाठी आणि साधेपणासाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ते एका महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार करताना दिसत आहेत. खरं तर, पद्मा नावाच्या या महिला कर्मचारी चेन्नईच्या टी नगर परिसरात काम करतात. ड्यूटीवर असताना त्यांना एक बेवारस पाऊच सापडला, ज्यात 45 सॉवरेन (सुमारे 360 ग्रॅम) सोन्याचे दागिने होते. हे दागिने स्वतःकडे ठेवण्याऐवजी पद्मा यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली आणि पाऊच पोलीस ठाण्यात जमा केला. यानंतर पोलिसांनी तपास करून दागिने त्यांच्या मूळ मालकापर्यंत पोहोचवले. जेव्हा ही गोष्ट रजनीकांत यांच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी पद्मा यांना त्यांच्या चेन्नई येथील घरी आमंत्रित केले आणि त्यांना सोन्याची साखळी घालून सन्मानित केले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि लोक रजनीकांत यांची खूप प्रशंसा करत आहेत. पद्माच्या या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनीही त्यांना स्वतः बोलावून सन्मानित केले आणि बक्षीस म्हणून एक लाख रुपयांचा चेक दिला. थलायवा यांनी यापूर्वीही केला आहे सन्मान रजनीकांत यांनी एखाद्याचे कौतुक करून त्यांना सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, २०२२ मध्ये त्यांना ‘कांतारा’ चित्रपट इतका आवडला की त्यांनी अभिनेता ऋषभ शेट्टीला घरी बोलावून सोन्याची साखळी भेट दिली होती. इतकंच नाही, तर रजनीकांत यांनी त्यांचे एक जबरा चाहते रजनी शेखर यांनाही खास भेट दिली आहे. मदुराईचे रहिवासी रजनी शेखर गरजू लोकांना फक्त ५ रुपयांमध्ये परोटा डिश खाऊ घालतात. त्यांच्या या सेवाभावाने प्रभावित होऊन रजनीकांत यांनी त्यांनाही सोन्याची साखळी भेट दिली होती. ‘जेलर २’ मध्ये दिसणार रजनीकांत रजनीकांत यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ते लवकरच ‘जेलर २’ या चित्रपटात दिसणार आहेत. यात विजय सेतुपती, मिथुन चक्रवर्ती आणि शाहरुख खान देखील कॅमिओ भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन करत आहेत. याशिवाय ते ‘थलायवर १७३’ मध्येही दिसणार आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!