प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये अचानक एका पोलिस कॉन्स्टेबलने गोंधळ घातल्याची घटना अहिल्यानगर येथे घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बसमध्ये गोंधळ घालत वाहक आणि चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरच्या राहता बसस्थानकात घडली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबलने “मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल”, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी, सायंकाळी 5.25 वाजता उदगीर आगाराची (जि. लातूर) एमएच 24 ए.क्यु 7970 क्रमांकाची बस राहता बसस्थानकात आली. फिर्यादी वाहक बालाजी पंडितराव बोरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येवला शहर येथे नेमणूक असलेले पोलिस कॉन्स्टेबल फकिरा तोताराम थोरात यांनी दारूच्या नशेत बसमध्ये धिंगाणा घालत चालक विकास बालाजी मुंडे यांना मारहाण केली. तसेच एवढ्यावरच न थांबता या पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांना बोलावून चालकावर हल्ला केला. यावेळी चालकाचा गणवेश देखील फाडण्यात आला. शिवीगाळ करत, “मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल”, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोपही वाहक बोरगावकर यांनी केला आहे. या घटनेमुळे काही काळासाठी बसस्थानकावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शासकीय कामात अडथळा राहाता पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये फकीरा थोरात, सार्थक बनसोडे (रा. साकुरी) आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा रजि. नं. 64/2026 नुसार बीएनएस कलम 132, 121(1), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक कोमल कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलिस या प्रकरणातील तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची पडताळणी करत आहेत. पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह कायद्याचे रक्षकच जेव्हा कायद्याचे उल्लंघन करून शासकीय कामात अडथळा आणतात, तेव्हा सर्वसामान्यांनी न्यायासाठी कोणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या दोषींवर नेमकी काय आणि किती कठोर कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Source link
मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल:राहता बसस्थानकावर पोलिस कॉन्स्टेबलचा नशेत गोंधळ, चालकाला मारहाण
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























