Homeमहाराष्ट्रस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवार अपात्र!:निवडणूक खर्चाचा हिशोब न देणे भोवले,...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवार अपात्र!:निवडणूक खर्चाचा हिशोब न देणे भोवले, विभागीय आयुक्तांची धडक कारवाई

पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी धडक कारवाई केली असून, पुणे महानगरपालिकेतील 22, पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील 3 अशा एकूण 40 उमेदवारांना 26 मे 2026 पासून पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईअंतर्गत अपात्र घोषित करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयासह त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विभागात 2 डिसेंबर 2025 रोजी एकूण 60 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या, तर 14 जानेवारी 2026 रोजी 6 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. मात्र या निवडणुका लढवणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील 22, पंढरपूर नगरपरिषदेतील 15 आणि अक्कलकोट नगरपरिषदेतील 3 उमेदवारांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10 (1ई) तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 16 (1ड) मधील कायदेशीर तरतुदींनुसार विहित 30 दिवसांच्या मुदतीत आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाकडे सादर न केल्याचे यातून उघडकीस आले आहे. पुणे महानगरपालिका आयुक्त आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, 5 व 25 मे 2026 रोजी पुणे विभागीय आयुक्तांसमोर संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र या सुनावणीदरम्यान उमेदवारांकडून कोणताही समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने, निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर करण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या सर्व उमेदवारांना आदेशाच्या तारखेपासून पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करण्यात आल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!