Homeमहाराष्ट्रडिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग:पाणी मागण्याच्या बहाण्याने केली होती छेडछाड, पुणे पोलिसांनी केली...

डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग:पाणी मागण्याच्या बहाण्याने केली होती छेडछाड, पुणे पोलिसांनी केली अटक

ऑनलाइन वस्तू घरपोच देणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर गावठाण परिसरात ही घटना घडली असून, आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने तरुणीची छेड काढली होती. श्रीधर हरीभाऊ कांबळे (वय २७, रा. शुक्रवार पेठ, मूळ रा. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कांबळे हा तरुणीने ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू देण्यासाठी तिच्या घरी आला होता. वस्तू दिल्यानंतर त्याने तरुणीकडे पाणी मागितले. तरुणीने पाणी दिल्यावर, कांबळेने तिला ‘तुम्ही खूप सुंदर दिसता’ असे म्हटले. त्याच्या या वर्तनामुळे तरुणी घाबरली आणि तिने आरडाओरडा केला. त्यानंतर कांबळे तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यांनी कांबळेचा मोबाइल क्रमांक मिळवला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. या आधारावर पोलिसांनी कांबळेला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कसबा पेठेत सहा लाखांची घरफोडी सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कसबा पेठेतील एका सोसायटीत घडली.या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह कसबा पेठेतील पवळे चौकात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार आणि कुटुंबीय सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील सहा लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. रात्री अकराच्या सुमारास घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. गजबजलेल्या पवळे चौकात घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रहिवासी भयभीत झाले. घरफोडी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन गायकवाड तपास करत आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!