Homeपुणे / पिंपरी-चिंचवडलहु बालवडकर यांच्याकडे कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपदाची धुरा; कोथरूडमध्ये भाजपची जोरदार तयारी

लहु बालवडकर यांच्याकडे कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपदाची धुरा; कोथरूडमध्ये भाजपची जोरदार तयारी

पुणे (कोथरूड) : पुणे महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागत असतानाच शहर भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमध्ये रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांच्यावर कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बालवडकर हे भाजपमधील एक निष्ठावंत आणि अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी दिली गेल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान बालवडकर यांनी बालेवाडी, औंध, बाणेर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण या भागांत भाजपसाठी दमदार कामगिरी केली. त्यांच्या प्रयत्नांतून मोहोळ यांना तब्बल २२,६३४ मतांची आघाडी मिळाली. त्याचप्रमाणे, विधानसभेतही त्यांनी कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना ३०,३४९ मतांनी आघाडी मिळवून दिली होती.

या विजयांमागे बालवडकर यांचा मोठा वाटा राहिल्यानेच त्यांना आता कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपद देऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

भाजप सध्या प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र रणनीती आखत असून, स्थानिक पातळीवर मजबूत संघटन रचना उभारण्यावर भर देत आहे. कोथरूड उत्तर मंडल अध्यक्षपदासाठी बालवडकर यांची निवड ही त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.

बालवडकर गेल्या काही वर्षांपासून प्रभाग क्र. ९ मध्ये सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्काच्या माध्यमातून आपली वेगळी छाप पाडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कोथरूडमध्ये भाजपची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा...

0
हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू,...

19 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ, वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, तुळ राशीला...

0
शुक्रवार, 19 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची स्थिती निर्माण होत आहे. कर्क राशीच्या लोकांना संपर्कांमुळे फायदेशीर करार मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना...

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळीचे नुकसान:बळीराजा संकटात, पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर, धामणगाव...

0
तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा...
spot_img

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...
error: Content is protected !!