Homeमहाराष्ट्रभोगावती नदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक कठडे, पाइप मोडून नदीपात्रात फेकले:अतिवृष्टीनंतर बंधाऱ्यावरील रस्त्यावर वाळू...

भोगावती नदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक कठडे, पाइप मोडून नदीपात्रात फेकले:अतिवृष्टीनंतर बंधाऱ्यावरील रस्त्यावर वाळू सांडल्याने वाहने घसरून पडण्याचा धोका‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड भागातून वाहणाऱ्या डिकसळ येथील भोगावती नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरील संरक्षक कठडे व पाईप मोडून नदीपात्रात फेकून दिले गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

.

मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून भोगावती नदी वाहत आहे. या नदीवर देगाव, डिकसळ, भोयरे या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यावरून वडाळा, सोलापूरला मोठ्या प्रमाणात लहान-मोठी वाहतूक होत आहे. मागील वर्षी पावसाळ्याच्या दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोगावती नदीला दोन ते तीन वेळा महापूर आला होता. या महापुरामुळे डिकसळ येथील भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे व पाईप पाण्याच्या प्रवाहामुळे असक्षम अवस्थेमध्ये बंधाऱ्यामध्ये पडले होते. महापूर येऊन अनेक महिने झाले तरीदेखील याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

सदर ठिकाणावरून कॉलेज, स्कूल, शासकीय कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी वर्दळ आहे. सदर ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ विद्यार्थ्यांसह नागरिकांना येत आहे. संबंधित विभागाने वाहनधारक व नागरिकांच्या जीवाचा विचार न करता कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नव्हती. संरक्षण कठडे व पाईप आहे या मोडकळीस ^विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झालेल्या बंधाऱ्यावरील संबंधित विभागाने तातडीने संरक्षक कठडे बसवावेत. डिकसळ येथील भोगावती नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरील एका बाजूचे संरक्षक कठडे व पाईप काढून नदीपात्रात टाकून दिल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने अपघात होण्यापूर्वी संरक्षक कठडे व पाईप बसवावेत. अन्यथा होणाऱ्या घटनेस अधिकाऱ्यास जबाबदार धरावे. — गोविंद पाटील ( नागरिक , डिकसळ) मोडकळीस आलेल्या अवस्थेमध्ये उभे होते. मागील आठवड्यात डिकसळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील लोखंडी संरक्षक पाईप व सिमेंटचे कठडे मोडून खाली नदीपात्रात ढकलून दिले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरील संरक्षक कठडे व पाईप नसल्याने, तसेच त्यातच बंधाऱ्यावरील रस्त्यावर वाळू मोठ्या प्रमाणावर सांडलेली असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने घसरून बंधाऱ्यावरून थेट नदीपात्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळ्यापूर्वी उपाययोजना आवश्यक भोगावती नदीला आलेल्या महापुरानंतर डिकसळ येथील बंधाऱ्याची झालेली दुरवस्था वेळीच दुरुस्त करणे पाटबंधारे विभागाचे कर्तव्य होते. मात्र, अनेक महिने हे संरक्षण कठडे मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभे राहिले आणि आता ते थेट नदीपात्रात पाडून देण्यात आले आहेत. रस्त्यावरील सांडलेली वाळू आणि कठड्यांचा अभाव यामुळे हा बंधारा आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. मोठा अपघात घडून जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने येथे तातडीने काम करणे गरजेचे आहे.

अपघात होण्यापूर्वी तातडीने कठडे बसवावेत



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!