इंडियन प्रीमिअर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात कालच्या सामन्यात एका नव्या ताऱ्याचा उदय झाला. विदर्भाच्या मातीतील वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे याने सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करताना राजस्थान रॉयल्सचे अक्षरशः कंबरडे मोडले. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात जे दिग्गज गोलंदाजांना जमले नाही, तो पराक्रम प्रफुलने आपल्या पहिल्याच षटकात करून दाखवला आहे. मुलाच्या या कामगिरीने हिंगे कुटुंबीय भावुक झाले असून, आपल्या लेकाला निळ्या जर्सीत खेळाताना पाहायचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुलच्या आई-वडिलांनी दिली. आयपीएल स्पर्धेत काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. सनराईजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला २१६ धावांचे लक्ष्य दिले. या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सला प्रफुलने पहिल्याच षटकात तीन मोठे झटके दिले. आयपीएल पदार्पणात पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने सलामीवीर वैभव सूर्यवंशी, अनुभवी ध्रुव जुरेल आणि प्रेटोरियस यांना सलग माघारी धाडले. एवढ्यावरच न थांबता, पुढच्या षटकात त्याने रियान परागचाही बळी घेतला. प्रफुलने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३४ धावा देत ४ महत्त्वपूर्ण बळी टिपले. प्रफुलने ४ षटकात ३४ धावा देत ४ बळी मिळवले. १० वर्षांची मेहनत फळाला आली – वडील भावूक प्रफुलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपूरमधील त्याच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. वडील प्रकाश हिंगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “प्रफुलने गेल्या १०-११ वर्षांत घेतलेल्या अफाट कष्टाची ही पावती आहे. त्याने प्रत्येक फलंदाजाला आपल्या कौशल्याने बाद केले. जेव्हा समलोचकांनी तो आयपीएलमधील पहिलाच असा गोलंदाज असल्याचे सांगितले, तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून आला.” वैभव सूर्यवंशीच्या विकेटबद्दल बोलताना त्यांनी अतिशय खिलाडूवृत्ती दाखवली. ते म्हणाले, “प्रत्येक सामना ही नवीन सुरुवात असते. काल वैभव चुकीच्या शॉटमुळे बाद झाला, याचा अर्थ तो कमी खेळाडू आहे असे नाही. कदाचित तो पुढच्या सामन्यात शतकही झळकावेल.” दुखापतीवर मात आणि ‘निळ्या जर्सी’चे स्वप्न प्रफुलचा प्रवास सोपा नव्हता. दोन वर्षांपूर्वी पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे आणि कोरोना काळामुळे त्याच्या कारकिर्दीत अडथळे आले होते. मात्र, एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये घेतलेले प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर त्याने पुनरागमन केले. आई अल्का हिंगे यांनीही आपल्या मुलाला आता भारतीय संघाच्या ‘निळ्या जर्सी’त पाहण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. कोण आहे प्रफुल हिंगे? ब्रिसबेनमध्ये घेतलेले विशेष सराव सत्र आणि कष्टाची तयारी यामुळे प्रफुल हिंगे आता हैदराबादच्या ताफ्यातील एक सर्वात घातक अस्त्र बनला आहे. पदार्पणातच त्याने केलेल्या या धमाक्यामुळे आगामी सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे.
Source link
IPLच्या पदार्पणातच प्रफुल हिंगेने रचला इतिहास:मुलाच्या कामगिरीने वडिलांचे डोळे पाणावले, आई म्हणाली – लेकाला निळ्या जर्सीत पाहायचेय
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...
तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ
धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...
पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...
9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ !
जमीन घोटाळ्याचे पुरावे शासनाकडेच उपलब्ध, मग मंदिर प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे ? - मंदिर महासंघ
धाराशिव - महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अहवालानुसार, निजाम शासनाने श्री तुळजाभवानी...
भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...
पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...
अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....





























