Homeदेश-विदेशPlan to resolve border dispute with China, both countries likely to focus...

Plan to resolve border dispute with China, both countries likely to focus on reaching an agreement soon | एससीओ समिट: चीनसोबत सीमावादाच्या निराकरणासाठी आराखडा, तातडीने करार करण्यावर दोन्ही देशांचा भर शक्य


  • मराठी बातम्या
  • आंतरराष्ट्रीय
  • चीनशी सीमा विवाद सोडविण्याची योजना आखत आहे, दोन्ही देश लवकरच करारावर पोहोचण्यावर लक्ष केंद्रित करतात

मुकेश कौसिका | नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी चीनच्या तियानजिन शहरात दाखल होतील. यादरम्यान ते राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतील. साऊथ ब्लॉकमधील सूत्रांनुसार या बैठकीत सीमावादाच्या निराकरणासाठी आराखडा ठरवला जाऊ शकतो. सीमांकनासाठी तातडीच्या करारास मंजुरीची योजना आहे. याचा अर्थ असा की चर्चेत कोणतीही प्रगती झाली तरी ती साध्य झाली पाहिजे. यासाठी एक कार्यगट स्थापन होऊ शकतो. या करारांतर्गत सिक्कीममध्ये चीनसोबतच्या सीमा वादाचे निराकरण शक्य आहे. या राज्याजवळ २२० किमी भारतीय सीमा चीनशी जोडलेली आहे.

सूत्रांनीदेखील पुष्टी केली की सीमावादासाठी दूरगामी परिणामांसह करार होऊ शकतो. यामध्ये पूर्व लडाखमध्ये एलएसीच्या दोन्ही बाजूंनी ५०-६० हजार सैनिकांची गर्दी कमी करणे, भविष्यात गलवानसारख्या संघर्षाची शक्यता नाकारण्यासाठी एक यंत्रणा तयार करणे, लष्करी संवाद वाढवणे यावर चर्चा होईल. यासाठीची चौकट देखील तयार करण्यात आली आहे. याशिवाय, ३५०० किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवरील मध्य व पूर्वेकडील सेक्टरमध्ये लष्करी जनरल्सच्या पातळीवर एक नवीन यंत्रणा तयार केली जाईल. अरुणाचल, सिक्कीममध्ये लेफ्टनंट जनरल पातळीवर एक संवाद यंत्रणा तयार केली जाईल.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अलीकडेच चीनला गेले होते. तेव्हा दोन्ही देशांनी या १० मुद्द्यांवर सहमती दर्शविली. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी दोन गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला गट सीमांकनासाठी व दुसरा गट सीमा क्षेत्रांच्या व्यवस्थापनावर काम करेल. तीन दिवसांपूर्वी चीनचे भारतातील राजदूत शु फेहोंग यांनीही याचा उल्लेख केला होता. २०१८ नंतर मोदी चीनला जात आहेत. त्यानंतर २०२० मध्ये गलवानमध्ये चिनी सैनिकांसोबत रक्तरंजित संघर्ष झाला होता. संबंध बिघडले. संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक फेऱ्या झाल्या. अखेर, ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियाच्या कझान शहरात मोदी-जिनपिंग यांच्या बैठकीपूर्वी दोन्ही सैन्यांनी संघर्षग्रस्त भागातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून संबंध सुधारण्यासाठी जलद प्रयत्न सुरू झाले.

झेलेन्स्की यांचा फोन…

तिआनजिन | जपान दौरा संपवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संध्याकाळी चीनच्या तियानजिन शहरात पोहोचले. येथे ते रविवारपासून सुरू होणाऱ्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होतील. शिखर परिषदेपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मोदींना फोन केला. मोदी म्हणाले, आम्ही संघर्षावर शांततेस पाठिंबा देतो.

एससीएओ खूप महत्त्वाचे…

अमेरिकेने रशियाच्या तेल खरेदीसाठी भारतावर २५% कर लादला असतानाच मोदींचा हा दौरा होत आहे. एससीओ परिषद भारतासाठीदेखील महत्त्वाची आहे. या शिखर परिषदेत २६ देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होतील. जगातील ४०% लोकसंख्या या देशांत राहते. जगाच्या जीडीपीमध्ये या संघटनेचा वाटा २४% आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

भारतीय खलाश राकेश चौहानचे अवयव बेपत्ता |

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराव्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
spot_img

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...
error: Content is protected !!