पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) नुकतीच राष्ट्रीय आयडियाथॉन ३.० स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. याप्रसंगी टाटा टेक्नॉलॉजीसचे प्रकल्प संचालक बालाजी मुंढे यांनी नवकल्पना हाच प्रगतीचा एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयू) या राष्ट्रीय स्तरावरील आयडियाथॉनचे आयोजन केले होते. मुंढे म्हणाले की, “आपण जुन्या विचारांकडे परत जाऊ शकत नाही, नवकल्पना हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. भूतकाळातून शिकवण घेऊन भविष्य घडवण्याची ताकद या नवकल्पनांमध्ये आहे.” यावेळी टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर डॉ. रंगा श्रीनिवास गुंटी, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्यासह डॉ. अनिल महेश्वरी, डॉ. शंकर देवसरकर, डॉ. भारत काळे, डॉ. विजय पाटील, विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आयडियाथॉन ३.० मध्ये देशभरातील एकूण ४० संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्रातून ३० संघ तर इतर राज्यांतून १० संघांचा समावेश होता. कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, “नवकल्पना ही केवळ एक कृती नसून, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विकसित होणारी विचारसरणी आहे. आयडियाथॉनसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याऐवजी निर्माते बनवतात.” त्यांच्या या विचारांतून पीसीयूचा नवकल्पना आणि उद्योजकता विकसित करण्याचा दृढ संकल्प दिसून आला. सहभागी संघांनी प्रचंड ऊर्जा, जिद्द आणि नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला: प्रथम क्रमांक व्हिआयटी पुणे (५० हजार रुपये रोख), द्वितीय क्रमांक पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) (३० हजार रुपये रोख) आणि तृतीय क्रमांक डी.जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (२० हजार रुपये रोख). विजेत्या संघांना प्रशस्तीपत्र, पारितोषिक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
Source link
पीसीयूमध्ये राष्ट्रीय आयडियाथॉन 3.0 पडली पार:नवकल्पना हाच प्रगतीचा मार्ग – टाटा टेक्नॉलॉजीसचे प्रकल्प संचालक बालाजी मुंढे
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























