Homeमहाराष्ट्रभारतीय ज्ञान परंपरा युवकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे:नेरवा एज्युकेशन फाउंडेशनच्या ज्ञानभारती परिसंवादात तज्ज्ञांचे मत

भारतीय ज्ञान परंपरा युवकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे:नेरवा एज्युकेशन फाउंडेशनच्या ज्ञानभारती परिसंवादात तज्ज्ञांचे मत

भारतीय ज्ञान परंपरा युवा पिढीपर्यंत आत्मविश्वासाने पोहोचवणे आवश्यक आहे. धर्म आणि अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा भाग असला तरी, ते समजून न घेता भारतीय ज्ञान परंपरेला धर्म आणि अध्यात्माशी जोडल्याने गोंधळ निर्माण होत आहे. मातृभाषेतूनच या परंपरेचा प्रभावी प्रचार आणि प्रसार होऊ शकतो, असा सूर नेरवा एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित ‘ज्ञानभारती’ परिसंवादात उमटला. भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित या परिसंवादाचे आयोजन भारतीय विचार साधना सभागृहात करण्यात आले होते. यात भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीमचे संस्थापक क्षितिज पाटुकले, डीआरडीओचे माजी समूह संचालक काशिनाथ देवधर, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीमधील स्कूल ऑफ वैदिक सायन्सेसच्या असोसिएट डीन प्रा. डॉ. माधवी गोडबोले, नेरवा एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. विंदी पुजारी, मराठवाडा मित्र मंडळातील प्रा. डॉ. सुजाता शेणई आणि फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद काटीकर यांचा सहभाग होता. शिल्पा देशपांडे यांनी मान्यवरांशी संवाद साधला. सुरुवातीला डॉ. विंदी पुजारी यांनी फाउंडेशनतर्फे भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. भारतीय ज्ञान म्हणजे काय आणि हे ज्ञान एकत्रित दृष्टिकोनातून नव्या पिढीपर्यंत कसे नेता येईल, याबाबत त्यांनी आपले विचार मांडले. काशिनाथ देवधर यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतीय ज्ञान प्रणालीचा वापर होऊ शकतो, असे नमूद केले. एकात्मिक दृष्टिकोनातून भारतीय ज्ञान प्रणालीचा विचार झाल्यास देशाच्या विकासासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असेही ते म्हणाले. क्षितिज पाटुकले यांनी भारतीय ज्ञान प्रणालीबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याकडे लक्ष वेधले. शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मूलभूत बदल केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. बदलत्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिक्षण प्रणालीविषयी माहिती युवा वर्गापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. आनंद काटीकर म्हणाले की, परंपरागत चालत आलेले ज्ञानार्जनाचे मार्ग बंद करून सध्या व्यावहारिक शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. भारतीय ज्ञान परंपरा हा मूल्यांचा विषय असून, ही प्रणाली आत्मसात केल्यास रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. डॉ. सुजाता शेणई यांनी भारतीय ज्ञान प्रणाली काय आहे, हे आधी समजून घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. या प्रणालीविषयी संशोधन झाल्यास सर्जनशीलतेने सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. यासाठी मातृभाषेलाही महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. प्रा. डॉ. माधवी गोडबोले म्हणाल्या की, शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत भारतीय ज्ञान प्रणालीचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. या प्रणालीचा अवलंब करताना शिक्षकाची भूमिकाही महत्त्वाची आहे. भारतीय ज्ञान प्रणालीविषयी प्रत्येकाने जिज्ञासा जागी ठेवणे आवश्यक असून, मूळ स्रोत न बदलता संकल्पना मांडणे महत्त्वाचे आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!