जिद्दीने आयुष्यातील संकटांशी लढणाऱ्या आणि कुटुंबासाठी आशेचा किरण असलेल्या एका २१ वर्षीय दिव्यांग तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. नाशिकमधील गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावर आई-वडिलांसाठी लिहिलेला भावनिक संदेश पाहून पोलिस आणि डॉक्टरांच्याही डोळ्यांत पाणी आले. दीक्षा दत्तू त्रिभुवन (वय २१, रा. शिल्पा आनंदवन, ध्रुवनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. दीक्षाने रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेतील सर्वात चटका लावणारी बाब म्हणजे, दीक्षाने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असा शेवटचा निरोप लिहिला होता. शवविच्छेदनादरम्यान ही बाब समोर आली. आपल्या आयुष्याचा शेवट करतानाही तिच्या मनात आई-वडिलांविषयी असलेले प्रेम या संदेशातून दिसून आले. ही बाब समजताच मोलमजुरी करून दीक्षाला शिकवणाऱ्या तिच्या पालकांचा रुग्णालयातच अश्रूंचा बांध फुटला. अभ्यासू आणि जिद्दी दीक्षाचा असा अंत दीक्षा जन्मतःच दिव्यांग होती, मात्र तिने कधीही आपल्या शारीरिक कमतरतेचे भांडवल केले नाही. ती शहरातील एका विशेष विद्यालयात शिक्षण घेत होती. अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीची दीक्षा आपल्या भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहत होती. तिचे वडील आणि भाऊ मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात, अशा परिस्थितीत शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा तिचा प्रयत्न होता. मात्र, अशा मनमिळावू आणि जिद्दी तरुणीने अचानक आत्महत्येचे पाऊल का उचलले, या प्रश्नाने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही सुन्न केले आहे. कारणांचा शोध सुरू; पोलिसांकडून तपास जारी स्वभावाने शांत, संयमी आणि अभ्यासू असलेली दीक्षा आपल्या कुटुंबासाठी आशेचा किरण होती. दिव्यांग असूनही ती जिद्दीने अभ्यास करत होती. दीक्षाच्या मनातील अस्वस्थता नक्की कशामुळे होती आणि तिने हे टोकाचे पाऊल कोणत्या मानसिक दबावाखाली उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हवालदार चंद्रकांत पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, दीक्षाच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
Source link
I Love You मॉम-डॅड:तळहातावर अखेरचा संदेश लिहून दिव्यांग तरुणीची आत्महत्या, नाशिकच्या ध्रुवनगर परिसरातील घटना
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























