नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या कथित दरोडा प्रकरणात पोलिसांनी आशिष सुबालाल तिवारी याला अटक केली आहे. तिवारी हा पत्रकार असल्याचे भासवत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात राजगड पोलिस ठाण्यांतर्गत खेड-शिवापूर पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजिज मेस्त्री यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कर्मचारी सध्या फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, मोठ्या रकमेच्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तिवारीसह संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांचा कथित सहभाग असल्याचे काही पुरावे मिळाले. त्यानंतर नऱ्हे पोलिसांनी तिवारीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच प्रमिला निकम आणि अजिज मेस्त्री हे पसार झाले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, त्यांच्या संभाव्य ठिकाणांची माहिती घेतली जात आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांचे मोबाइल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि आरोपींशी असलेल्या संपर्काची तपासणी होण्याची शक्यता आहे. दरोड्यातील एक कोटी रुपयांची रक्कम नेमकी कोणाची होती, घटना कधी व कुठे घडली, आरोपींनी कोणती कार्यपद्धती वापरली आणि या प्रकरणात आणखी किती व्यक्ती सहभागी आहेत, याचा तपास नऱ्हे पोलिस करीत आहेत. या प्रकरणामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
Source link
एक कोटी दरोडा प्रकरण:तोतया पत्रकाराला अटक; दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा, दोघेही फरार
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























