Homeमहाराष्ट्रगोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू:माझ्या लेकाची चिरफाड करू...

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू:माझ्या लेकाची चिरफाड करू नका.., पालकांचा आक्रोश

गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू पावल्याची घटना आज दिनांक 24 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील गणेश संतोष डोंगरे वय 13 वर्ष , रणवीर यशवंत शिंगाडे वय 14 वर्षे आणि राज अविनाश हनवते वय 11 वर्ष हे तिघे मित्र नेहमीप्रमाणे आजही गोदावरी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. नगीना घाट परिसरात होण्यासाठी गेलेल्या या मुलांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाली मात्र राज हानवटे हा कसाबसा पाण्याबाहेर पडला आणि त्याने आरडा ओरड करून जीव रक्षक दलातील जवानांना माहिती दिली. गोवर्धन घाट जीव रक्षक संघटनेचे अध्यक्ष शेख हबीब शेख अखिल यांच्यासह मोहम्मद सलीम मोहम्मद युनूस, कृष्णा रामप्रसाद पिंपरने आणि कालिदास सुदाम खिल्लारे यांनी नदीपात्रात उतरून मुलांचा शोध घेतला असता दोन्ह मुलांची मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक माडगे आणि पोलीस कर्मचारी ए एस आरदवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दरम्यान मयत गणेश डोंगरे यांच्या आईने मयत मुलाच्या पोस्टमार्टमला विरोध दर्शवला. माझ्या मुलाची चिरफाड करू नका असा आक्रोश तिने केला आहे. वृत्त लिहीपर्यंत दोन्ही मयत मुलांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली होती.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लेडी इंजिनिअरचे वडील म्हणाले- मुलगी दारू पीत नव्हती:अंत्यसंस्कारानंतर मसूरीला पोहोचले, जावयावर हत्येचा संशय व्यक्त...

0
गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विशाखापट्टणम येथील रहिवासी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता पी. राधा गायत्री यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवीन वळण आले...

नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील 38 रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न:सरासरी 71.84 टक्के मतदान, उद्या मतमोजणी

0
राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील...

पंजाबमध्ये बनावट व्हिडिओचा कट उघड:CM मान यांनी जत्थेदारांची भेट घेतली होती, व्हिडिओ त्यांचा नसल्याचे...

0
पंजाबच्या राजकारणात मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना बदनाम करण्यासाठी रचलेला एक मोठा कट आता पूर्णपणे उघड होताना दिसत आहे. ज्या व्हिडिओवरून विरोधक आणि...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना नवीन करार मिळेल, सिंह राशीला नवीन ओळख, धनु राशीला...

0
शनिवार, 20 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि नवीन करार मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांना कार्यस्थळी वेगळी...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...

फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...

0
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...
error: Content is protected !!