Homeमहाराष्ट्रमोहपा येथे भीषण अपघात, वडील-मुलीचा जागीच मृत्यू:बारावीच्या पेपरसाठी जात असताना घडली दुर्घटना;...

मोहपा येथे भीषण अपघात, वडील-मुलीचा जागीच मृत्यू:बारावीच्या पेपरसाठी जात असताना घडली दुर्घटना; एक युवती गंभीर जखमी

नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपा गावाजवळ गुरुवारी गिट्टीने भरलेल्या ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवती गंभीर जखमी झाली आहे. मृतकांमध्ये सुभाष केशव भिवणकर (वय ५०) आणि त्यांची मुलगी जान्हवी सुभाष भिवणकर (वय १८) यांचा समावेश आहे. दोघेही मोहपा येथील रहिवासी होते. वंशिका ज्ञानेश्वर नरुले (वय १८) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती देखील मोहपा येथीलच रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष भिवणकर हे त्यांची मुलगी जान्हवी आणि वंशिका यांना बारावीच्या परीक्षेसाठी उमरेडमार्गे घेऊन जात होते. जान्हवी आणि वंशिका यांचा गुरुवारी बारावीचा पेपर होता. मोहपा गावाबाहेर जात असताना हा अपघात घडला. गिट्टीने भरलेल्या एम. एच. ४०, बीजी ७७५० क्रमांकाच्या ट्रकसोबत दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, सुभाष भिवणकर आणि जान्हवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून गावात आणले. संतप्त जमावाने चालकाला मारहाण केली आणि ट्रकची केबिन पेटवून दिली. घटनेची माहिती मिळताच नागपूर जिल्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट दिली. आरसीबी पथक आणि इतर पोलीस दल तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!