राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महापालिका मानली जाते. आज जाहीर झालेल्या सोडतीनुसार मुंबईचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या पुढील महिला महापौर कोण असणार, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत सध्या शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष अशी महायुती सत्तेत आहे. या महायुतीकडे एकूण 118 नगरसेवक असून बहुमताचा आकडा 114 आहे. त्यामुळे मुंबईचे महापौरपद महायुतीलाच मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी असल्याने महापौरपदावर कोणताही ओबीसी, एससी किंवा एसटी आरक्षणाचा अडसर राहिलेला नाही. मात्र हे पद महिलांसाठी राखीव असल्यामुळे महिला नगरसेविकांमधूनच महापौर निवड होणार आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी भाजपकडून सातत्याने महायुतीचा महापौर बसेल, असे संकेत दिले जात होते. आता आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर भाजपकडून महापौरपदावर दावा करण्याची शक्यता अधिक बळावली आहे. कारण भाजपकडे मुंबईत खुल्या वर्गातील मोठ्या संख्येने महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्येच अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून महापौरपदासाठी ज्या महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत, त्यामध्ये राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे आणि शितल गंभीर यांचा समावेश आहे. याशिवाय मालाडमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेल्या योगिता सुनील कोळी यांचे नावही महापौरपदासाठी चर्चेत आहे. त्यांच्या विजयाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले आहे. तसेच दहिसरमधील वॉर्ड क्रमांक 2 मधून निवडून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्या दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत दाखल झाल्या असून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पूर्वी शिवसेनेत होत्या, मात्र पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचा राजकीय अनुभव आणि पक्षबदलाची वेळ यामुळे त्यांचे नाव अधिक चर्चेत आले आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण 130 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यापैकी भाजपकडे 89 पैकी 49 महिला नगरसेविका आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 65 पैकी 38 महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे महिलांच्या संख्येच्या बाबतीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष मजबूत स्थितीत आहेत. मात्र महापौरपद महायुतीकडे असल्याने अंतिम निर्णय हा महायुतीच्या नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे. पर्यायांची कमतरता नाही मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होणार हे निश्चित असले, तरी नेमकी कोणत्या महिला नगरसेविकेला ही संधी मिळणार, यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. भाजपकडे प्रशासनाचा अनुभव असलेल्या अनेक महिला नेते असल्याने पर्यायांची कमतरता नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणे, महायुतीतील समन्वय आणि वरिष्ठ नेत्यांचा निर्णय यावर मुंबईच्या पुढील महिला महापौराचे नाव ठरणार आहे. मुंबईची पुढची महिला महापौर नेमकी कोण? हा एकच प्रश्न मुंबईकरांच्या दृष्टीने मात्र आता महत्त्वाचा ठरतोय.
Source link
मुंबईची पुढची महिला महापौर कोण?:भाजपकडून कोणाच्या गळ्यात माळ? महिला नगरसेविकांची रेस; कोणत्या नावांची जोरदार चर्चा
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
























