मुंबईतील अॅन्टॉप हिल परिसरात एका २४ वर्षीय डॉक्टर तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्तुती सोनवणे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती ‘मास्टर ऑफ डेंटल सर्जरी’ (MDS) चे शिक्षण घेत होती. याप्रकरणी पोलिसांनी
.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ९ मार्च रोजी घडली. स्तुतीचे आई-वडील जेवण्यासाठी बाहेर गेले होते. हे दोघे घरी परत आल्यावर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. घरच्यांनी वारंवार हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सुसाईड नोटमध्ये प्रियकरावर गंभीर आरोप
तपासादरम्यान पोलिसांना स्तुतीच्या खोलीत ६ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये तिने आपला प्रियकर फजल मोहम्मद खान (३१) याच्यावर सततचा मानसिक छळ आणि चारित्र्यावर संशय घेतल्याचा आरोप केला आहे. फजल हा स्तुतीच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि तिला अत्यंत हीन वागणूक देत असे, असे नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. स्तुतीच्या मित्रांना त्यांच्यातील वादाची कल्पना होती. मित्र तिला अनेकदा चेष्टेने म्हणायचे, “आम्हाला तुला फ्रिजमध्ये पाहायचं नाहीये”. हा संदर्भ थेट दिल्लीतील कुख्यात श्रद्धा वालकर हत्याकांडाशी निगडीत होता. यावरून स्तुती किती तणावाखाली होती, याची कल्पना येते.
डेटिंग अॅपवरून झाली होती ओळख
अॅन्टॉप हिल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्तुती आणि वरळीचा रहिवासी असलेला फजल यांची ओळख एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून झाली होती. गेल्या एका वर्षापासून ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. फजल हा पेशाने इन्शुरन्स एजंट आहे.
आरोपीला अटक
स्तुतीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अॅन्टॉप हिल पोलिसांनी फजल मोहम्मद खान याला लोअर परेल परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा…
मोदी ‘भुवन’, तर मी स्वत: ‘रँचो’:आमिर खाने घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांची फटकेबाजी, ‘पीके’ अन् ‘गजनी’वर ठेवला सस्पेन्स
मुंबईच्या ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात नुकताच राजकारण आणि ग्लॅमरचा एक अनोखा मिलाफ पाहायला मिळाला. राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची मुलाखत बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याने घेतली. या मुलाखतीत गंभीर राजकीय विषयांसोबतच आमिरच्या गाजलेल्या चित्रपटांतील पात्रांवरून फडणवीसांनी लगावलेले राजकीय टोले सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहेत. सविस्तर वाचा…

























