Homeमहाराष्ट्रअमराठी बिल्डरची मराठी तरुणाला मारहाण:'तुम घाटी लोग सुधारोगे नही' म्हणत मारहाण; मनसेचा...

अमराठी बिल्डरची मराठी तरुणाला मारहाण:’तुम घाटी लोग सुधारोगे नही’ म्हणत मारहाण; मनसेचा भाजपवर निशाणा साधत तीव्र संताप

सुशील रहेजा नामक एका मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने मराठी तरुणाला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. मनसेने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या पद्धतीने न्याय करण्याचा इशारा दिला आहे. केंद्र राज्य व आता मुंबईतही भाजपची सत्ता आल्यामुळे रहेजा नामक बेडकांची डराव – डराव वाढली आहे, असे मनसेने म्हटले आहे. भाजपने मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी एका अमराठी व्यक्तीची निवड केली आहे. मराठी एकीकरण समितीने या प्रकरणी रान पेटवले आहे. हा वाद टोकाला भिडला असतानाच आता मुंबईतील एका अमराठी बिल्डरने मराठी तरुणाला ‘तुम घाटी के लोग कशी सुधरोगे नहीं’ असे म्हणत मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी भाजपवर शरसंधान साधत निर्वाणीचा इशारा दिला आहे. मनसे आपल्या पद्धतीने करेलच ते म्हणाले, “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्याकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे. आता पाहूया आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण, या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत! असा इशारा काळेंनी दिला आहे. बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच, असा इशाराही गजानन काळे यांनी या प्रकरणी दिला आहे. मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता दुसरीकडे, मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता यांचा 79 मतांनी विजय झाला आहे. भाजपने अमराठी चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केल्याने शहरात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मराठी एकीकरण समितीने आज भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. पण त्यानंतरही भाजपने महापौरपदी मेहता यांची नियुक्ती केली. यामुळे हा मुद्दा पुढील काही दिवस चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!