Homeमुळशीखारावडे येथे मोफत बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

खारावडे येथे मोफत बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

मुळशी  (खारावडे) : खारावडे येथील श्री म्हसोबा भैरवनाथ, काळूबाई व शंकर महादेव मंदिरांच्या पवित्र प्रांगणात मोफत बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात एकूण १७ नवदांपत्यांनी एकमेकांचा जीवनसाथी म्हणून स्वीकार केला. सलग २० वर्षे सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाचे आयोजन यंदाही श्री म्हसोबा देवस्थान ट्रस्ट आणि चंद्रकांत (अण्णा) भरेकर मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

आयोजक चंद्रकांत अण्णा भरेकर यांनी सांगितले की, “सध्याच्या महागाईच्या युगात लग्नाचा खर्च सामान्य कुटुंबांना झेपण्यासारखा उरलेला नाही. अनेकदा प्रतिष्ठेसाठी कर्ज काढून विवाह केले जातात आणि त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडतात. या पार्श्वभूमीवर २००३ पासून मुळशी तालुक्यात बिगर हुंडा सामुदायिक विवाह उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमाला पुणे जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.”

विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वधू-वरांना आयोजकांच्या वतीने संपूर्ण पोशाख व संसारोपयोगी भांड्यांचा संच भेट म्हणून देण्यात आला. याशिवाय, सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

विवाह सोहळ्याचे औचित्य साधून आरोग्य चिकित्सा शिबीर व रक्तदान शिबीराचाही आयोजन करण्यात आला. आरोग्य शिबिरात १०० हून अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर १५ जणांनी रक्तदान केले. यावेळी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी विवाहसंस्थेचे सामाजिक महत्त्व उलगडून सांगणारे प्रेरणादायी व्याख्यानही दिले.

या सोहळ्याला कालीपुत्र कालीचरण महाराज, माजी खासदार अशोकराव मोहोळ, आयोजक चंद्रकांत भरेकर, देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मधुरा भेलके, उपाध्यक्ष दिनेश जोगावडे, सचिव शंकरराव मारणे, खजिनदार लक्ष्मण मारणे, तसेच विठ्ठल भरेकर, किरण भरेकर, गणेश भरेकर, सुरेश भरेकर, दत्तात्रय मोहोळ, रमेश चोरघे, सुभाष रोकडे, विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील विविध राजकीय नेते, म्हसोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, स्थानिक सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या सामाजिक उपक्रमाला भरभरून साथ दिली.

या उपक्रमामुळे समाजात विवाहासारख्या महत्त्वाच्या टप्प्याकडे सकारात्मक आणि समंजस दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचे चित्र खारावड्यात दिसून आले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!