Homeमुळशीरोकडेश्वर हनुमान जयंतीनिमित्त घोटवडे गावात रंगला कुस्तीचा थरार; आदर्श ‘घोटवडे पॅटर्न’चे सर्वत्र...

रोकडेश्वर हनुमान जयंतीनिमित्त घोटवडे गावात रंगला कुस्तीचा थरार; आदर्श ‘घोटवडे पॅटर्न’चे सर्वत्र कौतुक

मुळशी (घोटवडे) : रोकडेश्वर हनुमान जयंतीच्या निमित्ताने घोटवडे गावात पार पडलेल्या कुस्ती आखाड्याने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला असून, या आखाड्याने ‘घोटवडे पॅटर्न’ नावाने एक नवा आदर्श उभा केला आहे. शनिवारी १३ एप्रिल  रोकडेश्वर मंदिरापासून कुस्तीला प्रारंभ झाला. ज्यांनी कुस्त्या पुरस्कृत केल्या, त्या ग्रामस्थांचा सन्मानाचा फेटा घालून मिरवणूक काढण्यात आली आणि पुढे मैदानात दिमाखात प्रवेश करण्यात आला.

या भव्य आखाड्यात एकूण ६२ कुस्त्या पार पडल्या. यामध्ये ४८ कुस्त्या चितपट, १२ गुणांच्या आधारे आणि ३ महिला कुस्त्या विशेष आकर्षण ठरल्या. मैदानात एकसंध आणि नियोजनबद्ध वातावरण होते. कुठेही गोंधळ किंवा गडबड न होता एक शिस्तबद्ध आखाडा अनुभवास आला.

या आखाड्यात सुमारे पंधरा लाख पंधरा हजार रुपये इतकी बक्षिसांची रक्कम पैलवानांना देण्यात आली. काही प्रेक्षणीय विजयांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पै. ओंकार दगडे, रामा कांबळे, सुजय तनपुरे, साहिल मोहोळ या पैलवानांनी आपल्या ताकदीची झलक दाखवली. शेवटची आणि बहुचर्चित कुस्ती भारत मदने विरुद्ध शुभम सिंधनाळे यांच्यात रंगली. ही कुस्ती अत्यंत चुरशीची ठरली आणि अखेर बरोबरीत सोडण्यात आली.

या संपूर्ण आयोजनामध्ये घोटवडे गावातील आजी-माजी पैलवान, ग्रामस्थ, युवक मंडळींनी एकत्र येऊन आखाड्याचे अचूक नियोजन केले. हा आखाडा आणि त्यामागील ‘घोटवडे पॅटर्न’ इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल असे आयोजकांनी सांगितले.

‘घोटवडे पॅटर्न’ म्हणजे काय?

  • पंच म्हणून आजी-माजी पैलवानांना संधी देण्यात आली.
  • निवेदकाचा माईक सुरू असताना व्यासपीठावर माईक बंद ठेवण्यात येत होता, ज्यामुळे मैदानातील आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता.
  • ज्यांनी कुस्ती पुरस्कृत केली, त्यांच्याच हस्ते ती कुस्ती लावण्यात आली.
  • प्रायोजकांचे नाव माईकवर न घेता, पैलवानांच्या हातात थेट रोख रक्कम देण्यात आली.
  • सर्व कार्यक्रम गोंधळमुक्त व अत्यंत सुस्थितीत पार पडला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!