मुळशी : नाशिक येथे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मुळशी तालुका वतीने घोटावडे फाटा येथे सोमवारी “जोडे मारो” आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, शिवा आरोग्य सेना पुणे जिल्हा प्रमुख आबासाहेब शेळके, पुणे जिल्हा समन्वयक भानुदास पानसरे, महिला आघाडी सह संपर्क संघटक स्वाती ढमाले, जिल्हा संघटक संगीता पवळे, तालुकाप्रमुख सचिन खैरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड, शिवा आरोग्य सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, युवा सेना तालुका अधिकारी राम गवारे, उपतालुका प्रमुख अनंता वाशिवले, राजाभाऊ शेळके, कालिदास शेडगे, अनिल आधवडे, लहू लायगुडे, शंकर सुतार (प्रभारी सरपंच, कासार आंबोली), दत्ताभाऊ काळभोर, शिवाजी बलकवडे, संदीप आमले, रामदास पोळेकर, राणी शिंदे, दिलीप मारणे, संभाजी ढमाले, सचिन ढमाले, मिथुन खिलारी, किशोर गायकवाड, अरुण विर, सचिन सावंत, नितीन लोयरे, संदीप शिंदे, चिंतामण शिंदे, तुकाराम गुंडगळ, दत्ता देवकर, अतुल गोडांबे, प्रसाद आमले, काळूराम गोडांबे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थितांनी कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला. आंदोलन शांततेत पार पडले.



































