Homeमहाराष्ट्रमेळघाटातील कढावमध्ये पाणीटंचाई, सीईओंचे टँकर पुरवठ्याचे आदेश:टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता...

मेळघाटातील कढावमध्ये पाणीटंचाई, सीईओंचे टँकर पुरवठ्याचे आदेश:टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता 9 वर पोहोचली

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कढाव येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मेळघाटातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कढाव गावात पाण्याचा कोणताही स्थानिक स्रोत उपलब्ध नाही. यापूर्वीच चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे कढावच्या समावेशाने टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. सीईओ गांधी यांनी मेळघाट भागाची वास्तविकता जाणून घेण्यासाठी नुकताच दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या. वारंवार सूचना देऊनही अधिकारी उपाययोजना करत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. या तक्रारींची दखल घेत सीईओ गांधी यांनी ग्रामपंचायत निधीतून विहिरींचे खोलीकरण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे, तसेच बोरवेलमध्ये अतिरिक्त पाइप बसवण्याचे आदेश दिले. ही कामे पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कढाव येथील भेटीनंतर सीईओ गांधी यांनी ढाकणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्यविषयक कामांचा आढावा घेतला. तसेच, सावऱ्या येथे पाणीपुरवठ्याची स्थिती तपासली. बोरिखेडा येथे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना तोट्या बसवून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने, गट विकास अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी पंचायत यांना गावात पाठवून पुढील पाच दिवसांत समस्या सोडवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा, संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीईओ सत्यम गांधी यांनी दिला. दुर्गम आदिवासी भागांतील पाणीटंचाई लक्षात घेता, सुरू असलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष आढावा घेणे हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. विविध योजनांची अंमलबजावणी, निधीचा वापर आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या सेवांची पडताळणीही यावेळी करण्यात आली. चिखलदरा तालुक्यात यापूर्वीच सेमाडोहसह आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांमध्ये दिवसातून दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा केला जातो. सध्या एकूण १९ टँकरद्वारे पाणी पुरवले जात असून, आता कढावचाही त्यात समावेश झाला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!