तुम्ही वैद्यकीय विद्यार्थी आहात. हृदयविकाराचा झटका आल्यास काय करावे… हे फक्त पुस्तकातच वाचलेले असते. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जिवंत माणसासमोर उभे असता, ज्याचे श्वास थांबत आहेत, तेव्हा हात थरथरू लागतात…’ अमेरिकन ॲकॅडमी ऑफ नर्सिंगच्या अध्यक्षा डॉ. डेब्रा बार्क्सडेल म्हणतात, ‘अनुभव भीतीदायक असतो. तुमच्याकडे अफाट ज्ञान असले तरी, जिवंत माणसावर त्याचा सराव करणे खूप आव्हानात्मक आहे.’ ही भीती संपवण्यासाठी आता वैद्यकीय जगात क्रांतीकारी बदल झाला आहे. आता विद्यार्थी थेट माणसांवर प्रयोग करण्याऐवजी ‘हाय-फिडेलिटी मेडिकल सिम्युलेटर’ म्हणजेच अगदी खऱ्या दिसणाऱ्या बाहुल्यांवर सराव करतात. या खास प्रकारच्या बाहुल्या श्वास घेऊ शकतात, पापण्या मिटू-उघडू शकतात, त्यांना घाम येतो आणि दुखापत झाल्यास त्यांच्यातून रक्त (लाल द्रव) देखील बाहेर पडते. काही बाहुल्या अशाही आहेत ज्यांना झटके येऊ शकतात किंवा त्यांच्या तोंडातून फेस येऊ शकतो. काही तर डॉक्टरांशी बोलतातही. काही दिवसांपूर्वी नर्सिंग विद्यार्थिनी जुलियाना विटोलो ‘मॉम-एनी’ नावाच्या गर्भवती बाहुलीची चाचणी करत होती. जेव्हा जुलियानाने विचारले, ‘तुम्हाला कसे वाटते आहे?’ तेव्हा त्या बाहुलीने पापण्या मिटल्या-उघडल्या आणि उत्तर दिले, ‘पोटाच्या खालच्या भागात थोडे दुखत आहे.’ वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना लक्षात घेऊन बाहुल्यांची रचनाही वेगळी ठेवली जाते. वेळेआधी जन्मलेल्या (प्रीमेच्युअर) बाळांच्या बाहुल्यांवर खऱ्यासारखे केस असतात, तर वृद्ध बाहुल्यांच्या त्वचेवर सुरकुत्या आणि डोळ्यांत मोतीबिंदूही दाखवतात. टॉर्चने डोळ्यांची तपासणी केली जाते, तेव्हा बुबुळे आकुंचन पावतात. यांना इंजेक्शन देऊ शकतो आणि नाडीही तपासता येते. जर एखाद्या ‘बाळा’च्या बाहुलीला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही, तर ओठांभोवतीची त्वचा निळी पडू लागते (हायपोक्सिया), ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरित निर्णय घ्यावा लागतो. सर्वात मोठा फायदा हा आहे की, येथे चूक झाल्यास कोणाचाही जीव जात नाही. सेटन हॉलच्या सिम्युलेशन डायरेक्टर जेनिफर मॅकार्थी म्हणतात,‘जर रुग्णाला 2 मिग्रॅ. औषध द्यायचे असेल आणि विद्यार्थ्याने फक्त 1.8 मिग्रॅ. दिले, तर ही गंभीर चूक आहे. बाहुल्यामध्ये बसवलेले तंत्रज्ञान हा किरकोळ फरकही ओळखते आणि चूक सुधारण्याची संधी देते.’ कंट्रोल रूममधून तज्ज्ञ या बाहुल्यांद्वारे बोलतातही. ते कधी ओरडतात, कधी वेदनेने कण्हतात, तर कधी प्रश्न विचारतात. यामुळे डॉक्टर आणि नर्स उपचारासोबतच त्वरित निर्णय घेणे आणि तणावपूर्ण वातावरणात रुग्णाशी बोलण्याची पद्धतही शिकतात. वातावरण खरे वाटावे, यासाठी कलाकारांना ‘नातेवाईक’ म्हणून बोलावले जाते वेल-कॉर्नेल सिम्युलेशन सेंटरचे प्रमुख डॉ. केविन चिंग म्हणतात, ‘काही मॅनिकिन्समध्ये अचानक परिस्थिती बदलण्याची प्रोग्रामिंग असते. यामुळे विद्यार्थ्यांना जलद विचार करण्याचे प्रशिक्षण मिळते. बाळ मॅनिकिनला सुस्त दाखवू शकतात, जेणेकरून विद्यार्थी लक्षणे पाहून समस्या ओळखू शकतील. उदा. बीपी कमी झाल्यावर फ्लुइड द्यायचे की नाही हे ठरवणे. वास्तविक वातावरण तयार करण्यासाठी जवळ चष्मा, फोन ठेवले जातात आणि कधीकधी ‘काळजीवाहू नातेवाईक’च्या भूमिकेत अभिनेत्यालाही बोलावले जाते. याला हायब्रीड सिम्युलेशन म्हणतात.’
Source link
रुग्ण व्हर्च्युअल, उपचार खरा; डॉक्टरांना बारकावे शिकवत आहेत ‘पुतळे’:नाडी चालणार, रक्त वाहणार, औषध देण्यात चूक झाल्यास सुधारण्याचा सल्लाही
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























