Homeमहाराष्ट्रMedical Council's big decision in Pune Porsche accident case | पुणे पोर्शे...

Medical Council’s big decision in Pune Porsche accident case | पुणे पोर्शे अपघात प्रकरणी मेडिकल कौन्सिलचा मोठा निर्णय: रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द, पोलिसांच्या मागणीला यश – Pune News

पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणातील रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोन डॉक्टरांवर मेडिकल कौन्सिलने मोठी कारवाई करत प्रकरणातील अंतिम निर्णय येईपर्यंत वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांचा वैद्यकीय

?

गेल्या वर्षी मे महिन्यात पुणे येथील कल्याणी नगर भागात एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा जीव गेला होता. दारूच्या नशेत भरधाव पोर्शे कार चालवत या दोघांना चिरडण्यात आले होते. भरधाव कार चालवणारा हा मोठ्या बिल्डरचा मुलगा होता. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मुलाच्या रक्ताच्या ठिकाणी आईच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. तसेच हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉ. तावरे आणि डॉ. हळनोरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती. त्याच्यावर मेडिकल कौन्सिलने आज निर्णय दिला आहे.

काय होते पोर्शे प्रकरण?

19 मे 2024 च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. पबमध्ये पार्टी करून परत जात असताना अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात पोर्शे कार चालवत होता. त्याने मागून एका दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींनी संपूर्ण शहर हादरून गेले. आरोपी हा शहरातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांचा मुलगा असल्याचे पुढे आले. त्याला वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक बळाचा वापर करून प्रयत्न करण्यात आल्याचे आरोप झाले. पोलिस, वैद्यकीय कर्मचारी आणि अन्य यंत्रणा यामध्ये गुंतल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. अल्पवयीन आरोपीचे आई-वडील, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला शिक्षा म्हणून फक्त निबंध लिहण्याचे आदेश देण्यात आले, ज्यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यावर आणि त्याला मिळालेली शिक्षा पाहून जनतेचा रोष आणखी वाढला. परिणामी, पोलिसांनी याप्रकरणात अधिक कठोर कारवाई सुरू केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्तीसगड पत्नीवर अत्याचार: पतीने मुलाला आईला लघवी प्यायला लावली

0
मराठी बातम्याराष्ट्रीयछत्तीसगड पत्नीवर अत्याचार: पतीने मुलाला आईला लघवी करायला लावली | व्हिडिओछत्तीसगड, कोरिया2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराछत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात पतीने पत्नीचे हात-पाय दोरीने बांधले....

हिमाचलमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता:कुल्लू-मंडी आणि शिमला येथे गारपिटीचा इशारा; लोकांना सतर्कता बाळगण्याचा...

0
हिमाचलची राजधानी शिमलासह राज्याच्या बहुतांश भागांत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात पुढील पाच दिवस पाऊस सुरू राहील. कुल्लू,...

19 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ, वृश्चिक राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता, तुळ राशीला...

0
शुक्रवार, 19 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची स्थिती निर्माण होत आहे. कर्क राशीच्या लोकांना संपर्कांमुळे फायदेशीर करार मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना...

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...
spot_img

जोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डे

0
मराठी बातम्याखेळजोनाथन डेव्हिड हॅट्रिक | कतार विरुद्ध विश्वचषक सामना कॅनडाने जिंकला; 2 लाल कार्डेक्रीडा डेस्क38 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'हॅटट्रिक... आत्महत्या ध्येय आणि रेड कार्ड.'हे...

वैभव सूर्यवंशीच्या प्रकरणात BCCI हस्तक्षेप करणार नाही:बोर्ड सचिव म्हणाले- सामना रेफरीला निर्णय घेण्याचा अधिकार,...

0
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी सांगितले की, श्रीलंका 'अ' संघाच्या खेळाडूला धक्का दिल्याबद्दल वैभव सूर्यवंशीवर काय कारवाई करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...
error: Content is protected !!