नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीनंतर मालेगाव महानगरपालिकेची आज, १८ फेब्रुवारी रोजी झालेली पहिलीच महासभा प्रचंड गदारोळात पार पडली. टिपू सुलतान यांच्या फोटोंचा वाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांची टिपू सुलतानसोबत केलेली तुलना आणि ३ हजार ४५ बनावट जन्म दाखल्यांचे प्रकरण यांमुळे महासभेच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महासभा सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने सर्व महापुरुषांचे फोटो महापौर शेख नसरीन बानो आणि उपमहापौर शान-ए-हिंद यांना भेट देण्यात आले. त्याचवेळी भाजपकडून संविधानाची प्रत भेट देण्यात आली. मात्र, हे फोटो सभागृहात स्वीकारण्यास आणि लावण्यास काही सदस्यांनी विरोध दर्शवला. “फोटो भेट द्यायचे असतील तर ते दालनात द्यावेत, सभागृहाचा वेळ वाचवावा,” या मुद्द्यावरून सभागृहात बराच वेळ गोंधळ सुरू होता. टिपू सुलतान प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले गेल्या काही दिवसांपासून उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे मालेगावचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने नवा वाद निर्माण झाला. टिपू सुलतान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच योद्धा असल्याचे विधान सपकाळ यांनी केले होते, ज्याचे पडसाद आजच्या महासभेत उमटले. बनावट जन्म दाखल्यांचा प्रश्न ऐरणीवर मालेगावात गाजलेल्या बनावट जन्म दाखल्यांच्या प्रकरणावर आजच्या सभेत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर प्रशासनाने ३ हजार ४५ जन्म दाखले रद्द केले असून १ हजार ४४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सत्ताधारी ‘इस्लाम पार्टी’ आणि ‘समाजवादी पार्टी’ने निवडणुकीत हे दाखले पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, रद्द केलेले दाखले कायदेशीर मार्गाने पुन्हा वितरित करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांकडून आणला जाण्याची दाट शक्यता आहे. गरीब लोकांवर अन्याय झाला – मुश्तकिम डिग्निटी समाजवादी पक्षाचे मुश्तकिम डिग्निटी यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले, “बनावट जन्म दाखल्या प्रकरणी थेट गुन्हे दाखल व्हायला नको होते. प्रशासकीय पातळीवर तहसीलदारांच्या सह्या आणि शिक्के खरे आहेत की नाही, याची हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी व्हायला हवी. या प्रकरणात ज्यांनी खरोखर बनावट काम केले त्यांच्यावर कारवाई व्हावी, मात्र हजारो गरीब नागरिकांना वेठीस धरून त्यांच्यावर अन्याय करू नका. ज्यांना खरोखर दाखल्यांची गरज आहे, त्यांना ते नव्याने मिळावेत.” शिवसेनेचा ठरावाला विरोध सत्ताधारी पक्षाकडून जन्म दाखले पुन्हा बहाल करण्याचा प्रयत्न होत असताना, शिवसेनेने मात्र याला तीव्र विरोध दर्शवला आहे. बनावट दाखल्यांच्या माध्यमातून रोहिंगे किंवा बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Source link
मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा वादळी:टिपू सुलतान फोटो आणि बनावट जन्म दाखल्यांवरून रणकंदन, शिवसेना-भाजप आक्रमक
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























